police health checkup
police health checkup 
मुंबई

खाकीच्या आरोग्यासाठी हातभार; पोलिसांसह सीआयएसएफ जवानांची मोफत कोरोना चाचणी...

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना संकटात फ्रंटलाईन वॉरीयर्स असलेल्या मुंबई पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपले कर्तव्य पार पाडत असतांना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र रस्त्यावर उतरून पोलिस आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पोलिसांप्रति कृतज्ञता म्हणून औरंगाबाद मधील डॉक्टरांचे पथक मुंबई पोलिसांच्या मदतीला आले असून त्यांच्याकडून पोलिसांची मोफत कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

राज्यभर कोरोना संकटात आपले कर्तव्य बाजावणारे साधारणतः 1200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरले तर 76 पेक्षा अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. पोलिसांना कोरोना संकटातून वाचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी तसेच कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला औरंगाबादच्या साईधाम फाउंडेशनने सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलिसांची आरोग्य तपासणी सुरू केली.

मुंबईत 1 जुलैपासून मुंबई पोलिसांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. त्यासाठी साईधाम फाऊंडेशनकडून 15 डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ज्या पोलिसांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मुंबईत 94 पोलिस ठाणी असून 55 हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. पोलिस मुख्यालयातून आलेल्या यादीप्रमाणे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. दिवसाला साधारणतः  3 पोलिस ठाण्यातील 300 कर्मचाऱ्यांनी तपासणी केली जाते. आतापर्यंत 47 पोलिस ठाण्यातील 5 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यातील 50 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली.

पुढील महिन्याभरात उर्वरित ठाण्यातील पोलिसांची तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय मुंबई विमानतळावर कार्यरत असणाऱ्या सीआयएसएफ जवानांची आरोग्य तपासणी तसेच कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. सर्व पोलिस कर्मचारी तसेच सीआयएसएफ जवानांची तपासणी केल्यानंतर कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत गरजेनुसार पुढेही तपासणी सुरू ठेवणार असल्याचे साईधाम फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

कोरोना संकटात सर्व फ्रंटलाईन वॉरीयर्स जीवाची बाजी लावून काम करत आहेत. अशा वॉरियर्सच्या पाठीशी राहणे आपले कर्तव्य आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानंतर आम्ही सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत आम्ही ही सेवा देणार आहोत.
- डॉ. सुमनजी, अध्यक्ष, साईधाम फाउंडेशन

---
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT