Salman Khan Fireing sakal
मुंबई

Salman Khan Firing: गॅलेक्सी अपार्टमेंट गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी तीन संशयितांना घेतलं ताब्यात

या हल्ल्यामागची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली आहे. |Anmol Bishnoi, brother of gangster Lawrence Bishnoi, has claimed responsibility for the attack.

सकाळ वृत्तसेवा

Galaxy aparment Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या राहत्या घरावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली. तर दुसरीकडे 3 संशयितांना गुन्हे शाखेने पनवेल मधून ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. (salman khan )

या हल्ल्यामागची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या घराची (Big update on the Galaxy Apartment shooting case)

घटनाक्रम

सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी या अपार्टमेंटच्या दिशेने दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही घटना पहाटे ५ वाजता घडली. तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तव्यानुसार त्या दोघांनी गॅलेक्सीच्या दिशेने बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या.(latest Bollywood crime news)

ही घटना घडली तेव्हा सलमान घरातच होता. तर त्याचे इतर कुटुंबीय देखील घरात होते. या घटनेनंतर तातडीने मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत तपासत नेतृत्व केले. याघटनेची दखल घेत बांद्रा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेने तपास सुरू केला. salman khan latest news

हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकल बांद्रा येथील एका चर्चच्या बाहेरून पोलिसांनी जप्त केल्या .सोबतच सलमानच्या घराची सुरक्षा आणखी वाढवली (latest Marathi Bollywood news)

हल्ल्यामागे बिश्नोई??

सलमान खानच्या घरा बाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली आहे. त्याने फेसबुकवर एक पोस्ट करत लिहिलं, 'सलमान खान याला ही शेवटची वॉर्निंग होती. पुढच्या वेळी गोळी घरावर नाही झाडली जाणार. (Lawrence Bishnoi's brother Anmol Bishnoi)

ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानले आहेस, त्यांच्या नावावर दोन कुत्रे आम्ही पाळळेत, बाकी मला फारसे बोलायची सवय नाही. सलमान खान आम्ही तुला हे फक्त ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे, जेणेकरून तुला आमची ताकद समजेल.' अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(who is Anmol Bishnoi)

यापूर्वी धमकी

गेल्या वर्षी मार्च 2023 मध्ये सलमान खानच्या वांद्रे स्थित ऑफिसमध्ये एक ईमेल आला होता, ज्यामध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि आणखी एकावर गुन्हा नोंदवला होता.(Lawrence Bishnoi, Goldie Brar salman khan)

लॉरेन्स बिश्नोई यांनी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सलमानने पाहिली असेल आणि पाहिली नसेल तर ती पाहावी, असे ईमेलमध्ये म्हटले होते. यानंतर गुन्हे शाखेने राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती.Lawrence Bishnoi on salman khan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT