मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आलेली दिसत आहे. त्या संदर्भात आज शिवतीर्थावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आठवडाभर या बैठका सातत्याने सुरू राहणार आहेत, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. (MNS Sandeep Deshpande)
या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशपांडे म्हणाले की, महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्यासोबत ईशान्य मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आठवडाभर या बैठका सुरू राहणार आहेत मुंबईतील सर्व विभागातील पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटणार आहेत. मनसे भाजप युतीची चर्चा या बैठकांमध्ये नाही, असंही देशपांडेंनी सांगितलं.
राज्यातल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गंमत सुरू आहे लोकांच मनोरंजन होतय. लोक हे सगळं पाहत आहेत याचा ते गांभीर्याने विचार ही करतील. ज्या पद्धतीने राजकारणी वागत आहेत त्यावरून लोकांचा राज ठाकरे यांच्यावर विश्वास वाढला आहे. या राजकीय खेळात महाराष्ट्रातील मराठी जनतेला,हिंदू बांधवांना राज ठाकरे यांचाच एक पर्याय आहे, असा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.