मुंबईः कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून सुरक्षा म्हणून वापरण्यात येणाऱ्या
सॅनिटायझरला औषध आणि प्रसाधन सामग्री कायद्यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे सॅनिटायझर विकण्यासाठी आता परवान्याची गरज
नसून त्याची खुली विक्री आणि साठा करता येणारेय.
आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागानं या बाबतची अधिसूचना जारी केली आहे. भारतासह जगभरात कोरोना महासारीचा प्रकोप झाला आहे. त्यापासून सुरक्षा म्हणून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. सॅनिटायझर मोठ्या प्रमाणात ऊपलब्ध व्हावं यासाठी त्याचा साठा करणं किंवा विक्रीसाठी औषध आणि प्रसाधन सामग्री अधिनियमनातून सूट मिळावी अशी मागणी करण्यात येत होती.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर मोठ्या प्रमाणावर गरज आहे. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध उपलब्ध असणं महत्वाचं आहे. त्यामुळे सरकारने औषध आणि प्रसाधन सामग्री अधिनियम 1940 मधून सॅनिटायझरला वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केलंय. त्यामुळे सॅनिटायझरचा कितीही साठा आणि विक्री करता येणारेय.
हेही वाचाः Watch Video: कल्याण स्टेशनवर जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण, घटना सीसीटीव्हीत कैद
कोरोना संसर्ग आज ही वेगाने पसरतोय. त्यामुळे सॅनिटायझरला सगळीकडेच मोठी मागणी आहे. एकट्या मुंबईत दररोज 5 लाखांहून अधिक सॅनिटायझरच्या बाटल्यांची मागणी आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाला. दुकानदारांनी सॅनिटायझर अव्वाच्या सव्वा किंमतीला विकले. आता चार महिन्यांनंतरही सॅनिटायझरला वाढती मागणी आहे. अशात सॅनिटायझरवरील निर्बंध हटवल्यानं त्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून किंमती वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
कोरोना संकटात सॅनिटायझर सर्वसामान्य लोकांसाठी फार उपयुक्त आहे. मात्र त्यावरील निर्बंध हटवल्याने त्यावर आता नियंत्रण राहणार नाही. शिवाय सॅनिटायझरची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं, ऑल फूड अँड ड्रग्स लायसेंस होल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी म्हटलं आहे.
संपादनः पूजा विचारे
Sanitizers can now be sold openly restrictions removed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.