Umbarli Dombivli Crime esakal
मुंबई

Dombivli Crime : सुपारी देऊन काटा निघण्याआधीच 'त्यानं' काढला काटा; जमिनीच्या वादातून भोईरांची हत्या, विकास पाटलाला अटक

खोणी जवळील उंबार्ली येथे राहणारे इस्टेट एजंट संजय भोईर (वय 43) यांची शुक्रवारी रात्री हत्या झाली होती.

शर्मिला वाळुंज

संजय व विकास यांच्यात जमिनीचा जुना वाद आहे. या वादातून संजय आपला काटा काढणार असल्याचा संशय विकास याला होता.

डोंबिवली : खोणी जवळील उंबार्ली येथे राहणारे इस्टेट एजंट संजय भोईर (वय 43) यांची शुक्रवारी रात्री हत्या झाली होती. जमिनीच्या जुन्या वादातून उंबार्ली येथे राहणारे विकास पाटील (वय 38) यांनी त्यांची हत्या केली असून मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) त्यांना अटक केली आहे. जमिनीचा जुन्या वादातून संजय हे मारेकऱ्यांना सुपारी देऊन आपला काटा काढतील, अशी शंका विकास यांना होती. हे संशयातूनच त्यांनी आपला काटा निघण्याआधीच संजय यांचा काटा काढण्याचे ठरवित त्यांची हत्या केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.

डोंबिवली पूर्वेतील खोणी येथील उंबार्ली गावात संजय भोईर राहतात. भोईर हे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात एजंटचे काम करतात. शुक्रवारी रात्री संजय भोईर यांचा मृतदेह उंबार्ली जवळील मामाश्री ढाब्याच्या पाठीमागील निर्जन स्थळी आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

भोईर यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूना होत्या. संजय यांचा मुलगा राहुल यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड व पोलिस अधिकारी, अंमलदार यांचे विशेष पथक तैनात करत तपास सुरु केला.

घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. उंबार्ली येथील रिक्षा चालक विकास पाटील याला उंबार्ली येथून अटक केली. पोलिस तपासात विकास याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने संजय यांची हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

संजय व विकास यांच्यात जमिनीचा जुना वाद आहे. या वादातून संजय आपला काटा काढणार असल्याचा संशय विकास याला होता. त्याचा राग मनात धरुन विकास यांनी संजय याच्याशी संगनमत केले. संजय याला शुक्रवारी रात्री एकांतात गाठले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले असल्याची माहिती समोर आली आहे. विकास याच्या सोबत त्याचा आणखी एक साथीदार असून तो अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा तपास घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांना महिलेनं झापलं? आता तिनेच सांगितलं सत्य; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून...

Nashik News: धर्मांतर व बलात्कार प्रकरण गंभीर; फरार निदा खानचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय!

Sangli Yerala River Drowning : येरळा नदीत ८ जण बुडाले, एका तरुणीचा मृत्यू; पोहण्याचा मोह ठरला जिवघेणा

Mumbai Pune Expressway: दोन्ही मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुले; ‘मिसिंग लिंक’ची ‘मुंबई लेन’ सकाळी बंद अन् दुपारी दिलासा, वाहनचालकांना मनस्ताप!

Perfect Sunday Breakfast: झटपट बनवा कुरकुरीत आणि हेल्दी 'रवा टोस्ट', रविवारच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT