Sanjay Raut_PMLA 
मुंबई

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही लढणारे...

संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना बुधवारी जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली, यावेळी समर्थकांच्या आणि शिवसैनिकांच्या मोठ्या गर्दीतून त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आमची अटक बेकायदा असल्याचं न्यायालयानं म्हटलं म्हणजे खरंच असेल असं त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut first reaction after coming out of jail in Patra Chawl Case)

पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की, तुमची अटक बेकायदा असल्याचं म्हटलंय, यावर राऊत म्हणाले, "न्यायालय म्हणतंय म्हणजे खरंच असेल आम्ही लढणारे आहोत. आता कार्यकर्त्यांनी ठरवलंय तिकडे जाणार आहोत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणारच"

विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांचा आवाज खोल गेलेला होता. यावेळी त्यांच्या आजूबाजुला शिवसैनिकांचा उत्साह तर खूप होता पण त्यांच्या त्यांचा चेहरा काहीसा दमल्यासारखा दिसत होता.

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळं संजय राऊत १०० दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज झाले असून त्यांच्या घरी दिवाळीचा माहौल तयार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT