sanjay raut esakal
मुंबई

'दोन कॅबिनेट मंत्री आणि मध्यावधी निवडणुका..', राऊतांच्या पत्राने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता नवा खुलासा केला आहे. त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून धक्कादायक आरोप केले आहेत. (Sanjay Raut writes letter to vice president)

एक महिन्यापूर्वी मला काही लोक भेटले. त्यांनी राज्यातील महविकास आघाडी सरकार पाडण्यात मदत करण्याचं सांगितलं. असं न केल्यास कारवाई होईल, अशा इशारा दिल्याचा खुलासा राऊत यांनी केला आहे. या व्यक्ती सरकारी यंत्रणेतील होत्या. (Sanjay Raut News)

माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासारखं तुरुंगात जावं लागेल, अशी धमकीच दिल्याचा दावा खासदारांनी केलाय. तसेच राज्यातील कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि दोन मोठ्या नेत्यांना अटक होणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. या घटनांमुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार, असं भाकीत वर्तवलं होतं. ईडीचा राजकीय वापर होत असल्याचं खबळजनक पत्र संजय राऊत ट्वीट केलंय.

राऊत यांनी संबंधित पत्र शरद पवार, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, आरजेडीचे मनोज कुमार झा, समाजवादी पार्टीचे मनोज कुमार झा यांच्यासह अन्य काही नेत्यांनाही पाठवलं आहे. यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र नावाचं आणखी एक ट्वीट करत सूचक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT