Heat
Heat 
मुंबई

मुंबईकर उकाड्याने हैराण; शनिवारी विक्रमी तापमान

भाग्यश्री भुवड

मुंबई: शहरात (Mumbai) शनिवारी (Saturday) गेल्या 10 वर्षातील सर्वात (Highest Temperature in 10 Years) जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दिवसाचे कमाल तापमान 37.4 अंश सेल्सिअसवर होते. त्याच्या आदल्या दिवशी 34.5 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले होते. त्यामुळे, गेल्या 10 वर्षांतील शनिवार हा मुंबईतील सर्वात उष्ण (Hottest Day in Mumbai) दिवस म्हणून नोंदला गेला. मुंबईत शनिवारी संपूर्ण दिवसात ढगाळ (Cloudy) वातावरण होते. ढगाळ वातावरणात जमिनीकडून आकाशाकडे दूरवर जाणारे रेडिएशन्स (Radiations) जागीच थांबतात, त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली. (Saturday was hottest day in Mumbai in Last 10 Years)

यापूर्वी 3 मे रोजी शहरात 36.1 अंश सेल्सिअस तपमान नोंदवण्यात आले होते. त्यानंतर, शनिवारी 2016 नंतरचे सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. शनिवारी तापमानाचा पारा अचानक वाढला कारण गुरुवारपासूनच ढगाळ वातावरण होते आणि शनिवारी पूर्णतः ढगाळ झाले होते. तौक्ते वादळामुळे मुंबईसह अनेक भागात पावसाचा शिडकाव झाला. चक्रीवादळ तौक्तेमुळे हवामानावर परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर घनदाट ढग तयार झाले आणि त्यातून उष्ण वारे वाहू लागले.

आज संध्याकाळपासून पावसाचा अंदाज

आज संध्याकाळपासून पावसाचा अंदाज IMD मुंबईने वर्तवला आहे. उद्याही पावसाची शक्यता आहे. पाऊस पडल्यानंतर आपोआपच दोन दिवसांनी हे तापमान कमी होईल, असा अंदाज IMDच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी व्यक्त केला आहे. साधारणत: मुंबई, ठाणे आणि पालघर मधील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडून ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 35 ते 50 किमी प्रतितास दरम्यान असण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्रीपासून मुंबईतील ही अनेक भागात पाऊस पडला तसाच तो आज आणि उद्याही पडेल असे ही आयएमडीएकडून सांगण्यात आले आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT