file 
मुंबई

सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दोन वेळा जन्मठेप होऊनही न डगमगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील अद्भुत क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत व उत्तुंग प्रतिभा लाभलेले कवी होते. देश पारतंत्र्यात असताना हजारो लोकांनी हालअपेष्टा सोसल्या, अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अशा स्वातंत्र्यसेनानींमध्ये सावरकर यांचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी येथे काढले.


"स्वातंत्र्यवीर सावरकर ः सध्याच्या संदर्भात' या डॉ. अशोक मोडक लिखित पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते.

1857 च्या लढ्याची तुलना शिपायांचे बंड अशी ब्रिटिशांनी केली असली, तरीही तो लढा इंग्रजांविरुद्ध देशाचा पहिला स्वातंत्र्यलढा होता, असे सावरकरांनी निक्षून सांगितले. सावरकरांसारख्या थोर नेत्यांच्या योगदानामुळेच अनेक झंजावातांना सामोरा जात देश आज ताठ मानेने उभा आहे, असे राज्यपाल म्हणाले. सावरकरांनी जातिभेदाला नेहमी विरोध केल्याचे स्मरण देत जातिभेद दूर करणे ही सावरकरांना खरी आदरांजली ठरेल, असे कोश्‍यारी यांनी सांगितले.

या वेळी लेखक डॉ. अशोक मोडक यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली, तर कार्यवाह जयप्रकाश बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीचे कार्यवाह वसंत रानडे, महाराष्ट्र सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT