cigarette 
मुंबई

Lockdown : बाजारात दुय्यम दर्जांच्या सिगारेटची चलती, ते ही दुप्पट दराने, वाचा

सकाळवृत्तसेवा

पनवेल : लॉकडाऊनमुळे बाजारात प्रतिष्ठित ब्रँडचे सिगारेट उपलब्ध होत नाही. त्यामुळे तलफ भागवण्यासाठी धूम्रपान करणारे दुय्यम दर्जाच्या सिगारेटकडे वळले आहे.

इतर काळात ग्राहकांच्या प्रतीक्षेत दुकानात पडून असलेले दुय्यम दर्जाच्या सिगारेटची सध्या चलती आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ब्रँडेड सिगारेट विक्रीवर बंदी असल्याने ते गोदामात पडून आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मद्यपी तसेच धूम्रपान करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सुरुवातीला किरकोळ बाजारात उपलब्ध असणारे ब्रँडेड कंपनीचे सिगारेट दुप्पट भावाने विकत घेऊन काही जण आपली तलफ भागवत होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने किरकोळ दुकानात उपलब्ध ब्रँडेड सिगारेटचा स्टॉक संपल्याने दुय्यम दर्जाचे सिगारेट पुढे करत आहेत. अडचणीत सापडलेले सिगारेट ओढणारे पर्याय म्हणून दामदुप्पट किमतीत कधीही घेत नसलेले सिगारेट खरेदी करत आहेत.

विक्रेते खूश
बाजारात उपलब्ध असलेल्या नामांकित कंपनीच्या सिगारेटसोबत इतरही काही कंपनीचे सिगारेट उपलब्ध आहेत. ते जवळपास अर्ध्या किमतीचे असूनही ग्राहक खरेदी करण्यास रस दाखवत नाही. अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांकडे अनेक महिन्यांपासून दुय्यम दर्जाची सिगारेट पडून आहेत. सध्याच्या अडचणीच्या काळात पडून असलेल्या या सिगारेटना दुप्पट किंमत मिळत असल्याने विक्रेतेही खुशीत आहेत. 

सिगारेटचे दर (रुपयांत) -

  • कंपनी - पूर्वीचे दर - सध्याचे दर 
  • नामांकित कंपनी  - 100 ते 150 - 300 ते 350
  • दुय्यम कंपनी - 50 ते 60 - 120 ते  150

selling of duplicate cigarette Selling at double the price on the black market

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT