मुंबई

सीरिअल किलर रामन राघवच्या मुसक्या आवळणारे पोलिस अधिकाऱ्याचे निधन

पूजा विचारे

मुंबईः ५० वर्षांपूर्वी मुंबईत जबरदस्त दहशत निर्माण केलेला सीरियल किलर रामन राघवच्या मुसक्या आवळणारे पोलिस अधिकारी अॅलेक्स फियालोह यांचे निधन झाले आहे. रामन याला अटक करण्यात सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त जिन अलेक्स फियालोह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. फियालोह यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

मुंबईकरांना रामन राघवच्या दहशतीतून मुक्त करणाऱ्या फियालोह यांच्या कारवाईवर खूश होऊन पोलिस दलाने त्याकाळात त्यांना १००० रुपयांचं बक्षीस देऊ केलं होतं. तसंच फियालोह यांनी अनेक जटील गुन्हे उघडकीस आणले मात्र रामन राघव याला अटक केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते. उत्तर मुंबई रामन राघवने पुरुष, स्त्रीया आणि लहान मुलं अशा ४१ लोकांच्या हत्या केल्या होत्या. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातून फियालोह यांनी रामन राघव याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

१९६८ सालचा पावसाळा हा मुंबईसाठी मोठा दहशतीचा होता. या वर्षी शहरातील पुरुष, महिला आणि लहान मुलांच्या अतिशय निघृणपणे हत्या होत होत्या. लोखंडी रॉड, दगड यांसारख्या वस्तूंचा वापर करून रामन राघव याने हत्यासत्र सुरू ठेवले होते.  एकामागून एक होत असलेल्या या हत्याकांडामुळे उत्तर मुंबईत प्रचंड दहशत निर्माण झाली होती. २४ ऑगस्ट रोजी सब इन्स्पेक्टर अॅलेक्स फियालोह यांनी मुंबईतील डोंगरी भागात स्वच्छ सूर्यप्रकाशात भिजलेली छत्री घेऊन जाताना एका व्यक्तीला पाहिलं. त्यानंतर फियालोह हे त्या व्यक्तीपर्यंत चालत गेले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो व्यक्ती सिरियल किलर रामन राघव होता.  अशा प्रकारे फियालोह यांनी राघवच्या मुसक्या आवळल्या.

फियालोह हे वांद्रे येथे कटुंबियांसह वास्तव्यास होते. शुक्रवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. वांद्रे येथील अँड्रूस चर्चमध्ये शनिवारी फियालोह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फियालोह यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

serial killer raman raghav arrest retired polie officer Alex Fialoh passes Away

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT