mumbai-municipal-corporation
mumbai-municipal-corporation sakal
मुंबई

मुंबई शहरातील मैलापाणी पर्जन्यवाहिन्यांमध्ये जाणार नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई शहरातील मैलापाणी पर्जन्यवाहिन्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी महापालिका आता उपाययोजना करणार आहे.

मुंबई - शहरातील मैलापाणी (Sewage Water) पर्जन्यवाहिन्यांमध्ये (Rainwater Canals) जाण्यापासून रोखण्यासाठी महापालिका (Municipal) आता उपाययोजना करणार आहे. त्यासाठी पालिका सल्लागार नियुक्त करणार आहे. मुंबईतील सुमारे तीन लाख ४८ हजार ६७२ मालमत्तांपैकी तब्बल ७६ हजार ४२५ मालमत्तांमधील मैलापाणी पर्जन्यवाहिन्यांमध्ये अथवा नाल्यांमध्ये सोडले जाते. त्याचबरोबर नद्यांमध्येही मैलापाणी मोठ्या प्रमाणात सोडले जाते.

हरित लवादाने मुंबईतील मैलापाणी नाले, पर्जन्यवाहिन्यांमधून थेट नैसर्गिक स्रोतांमध्ये जात असल्याबद्दल महापालिकेचे कान टोचले होते, तसेच काही कोटींचा दंडही आकारला होता. त्यानंतर महापालिकेने २०१८ मध्ये अभ्यास करून नदी, नाल्यांमध्ये जाणाऱ्या मैलापाण्याचा शोध घेतला. त्यावेळी ३५ हजार ४४२ मालमत्तांमधून मैलापाणी थेट पर्जन्यवाहिन्यांमध्ये, ४० हजार ७५६ मालमत्तांमधून मैलापाणी नाल्यांमध्ये, तर २०७ ठिकाणी मैलापाणी थेट समुद्रात सोडले जात असल्याचे आढळले. तसेच २० ठिकाणी मैलापाणी खाड्यांमध्ये सोडले जात असल्याचेही आढळून आले. त्यामुळे मैलापाण्याचा सर्वाधिक फटका मिठी नदीला बसत आहे.

दरम्यान, मैलापाणी थेट नैसर्गिक स्रोतांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना करणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून शिफारशीनुसार पुढील प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सल्लागार नियुक्तीसाठी महापालिकेने निविदा मागवल्या आहेत.

आता काय काम होणार

- मैलापाणी नदी नाल्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या ठिकाणांची माहिती जमवणार

- संबंधित परिसरांचा तांत्रिक अभ्यास करणार

- मैलपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्‍यक प्रकल्पाचा आराखडा तयार करणार

- प्रकल्प राबवण्यासाठी निविदा प्रक्रियांचा मसुदा तयार करणार

दृष्टिक्षेपात

१. एच-वेस्ट वॉर्ड (वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ) मध्ये सहा हजार ६१२ मालमत्तांमधून मैलापाणी पर्जन्यवाहिनीत, तर दोन हजार ३९६ ठिकाणी मैलापाणी नाल्यांमध्ये सोडले जाते.

२. एफ-उत्तर वॉर्ड (माटुंगा, सायन, दादर) येथील तीन हजार ५०६ मालमत्तांमधील मैलापाणी पर्जन्यवाहिनीत, तर दोन हजार ९२९ ठिकाणी मैलापाणी नाल्यांमध्ये सोडले जाते.

३. एम-पूर्व प्रभाग (देवनार, गोवंडी) येथील तीन हजार ३१४ ठिकाणचे मैलापाणी पर्जन्यवाहिनीत, तर ३३९ ठिकाणचा मैला नाल्यांमध्ये जातो.

नाले,पर्जन्यवाहिन्यांवरही ताण

नाले आणि पर्जन्यवाहिन्यांमधून केवळ पावसाचे पाणी वाहून जाणे अपेक्षित आहे; मात्र त्यात मैलादेखील येत असल्याने पर्जन्यवाहिन्या आणि नाल्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबण्याची शक्यता अधिक वाढते. मैला नाल्यांमध्ये येण्यास बंद झाल्यास नाल्यांवरील हा ताण हलका होऊन पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT