Sharad Pawar Sakal
मुंबई

BMC निवडणुकांसाठी पवारांचे आदेश; म्हणाले, ''कोणी सोबत येईल...''

शरद पवार मुंबईत स्वतः फिरून पक्षाला वेळ देणार असून, मुंबई महापालिकेसाठी सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः सूत्र हातात घेतली असून, कोणता पक्ष सोबत येईल नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट (Nariman Point) इथल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी वरील आदेश देण्यात आले आहेत. (Sharad Pawar On BMC Election)

याशिवाय शरद पवार मुंबईत स्वतः फिरून पक्षाला वेळ देणार असून, मुंबई महापालिकेसाठी (BMC) सर्व ठिकाणी तयारी करण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. प्रत्येक वॉर्डमधील परिस्थितीचा अहवाल पवार यांना देण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतः आपण लक्ष देणार असल्याचं शरद पवार यांचं पदाधिकऱ्यांना आश्वासनं दिले आहे. (BMC Election News In Marathi)

पवारांकडून मलिकांचा उल्लेख

या बैठकीत शरद पवार यांच्याकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांचा देखील उल्लेख करण्यात आला. मुंबईत नवाब मलीक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र, अद्याप त्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर होऊ शकलेले नाही असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT