File Photo 
मुंबई

धूर दिसताच 'तिने' लोकलमधून उडी मारली, अन्...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वडाळा स्थानकात पनवेल लोकलमधून धूर आल्याचे निदर्शनास येताच, घाबरून उडी मारल्याने तरुणी जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ट्विंकल बेनिकड्डी (रा. संघवी पार्क, मिरा रोड पूर्व) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिला उपचारार्थ सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सीएसएमटीहून पनवेलला जाणारी लोकल वडाळा स्थानकातून पुढे निघताना एका डब्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी लोकलखालील यंत्रणेला आग लागल्याचा चुकीचा समज प्रवाशांमध्ये निर्माण झाल्याने त्याच लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या ट्विंकलने लोकलमधून तात्काळ उडी मारली.

जखमी ट्विंकलला रेल्वे पोलिसांनी तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. या तरुणीवर उपचार सुरू असल्याचे वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.

तो धूर ‘ब्रेक बायडिंग’!
या घटनेनंतर पनवेल लोकल वडाळा स्थानकातच रद्द करण्यात आली. या लोकलला कारशेडमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. लोकलमध्ये ब्रेक बायडिंगसारख्या तांत्रिक समस्येमुळे धूर येण्याची शक्‍यता असते. ब्रेकच्या घर्षणामुळे धूर निर्माण होऊ शकतो. या प्रकारात प्रवाशांना कोणताही धोका नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

As she saw the smoke, 'she' jumped from the local

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT