Actress Shilpa Shetty and businessman Raj Kundra photographed outside Bombay High Court after the court ordered Kundra to deposit ₹60 crore before traveling abroad.

 

esakal

मुंबई

Shilpa Shetty and Raj Kundra News : शिल्पा शेट्टी - राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका!

Bombay High Court restricts Kundra Couple from traveling abroad : 'ही' अट पूर्ण केल्याशिवाय आता परदेशात जाता येणार नाही

Mayur Ratnaparkhe

Shilpa Shetty and Raj Kundra Faces Major Legal Setback from Bombay High Court : शिल्पा शेट्टीच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कथित ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची आज(बुधवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, लॉस एंजेलिस आणि इतर परदेशात प्रवास करायचा असेल तर ६० कोटी रुपये जमा करा. यामुळे कुंद्रा दाम्पत्यास हा एकप्रकारे मोठा झटकाच आहे.

कारण, ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दाखल केलेल्या एफआयआर संदर्भात त्यांच्याविरुद्ध जारी झालेले लूकआउट सर्क्युलर (एलओसी) रद्द करण्याची मागणी, कुंद्रा दाम्पत्याने  याचिकेद्वारे केली होती. यावर आता न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

कधी होणार पुढील सुनावणी? -

या प्रकरणातील पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. न्यायालयाने ही अट अशावेळी ठेवली आहे, जेव्हा मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या कथित ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करत आहे. खरंतर, कुंद्रा दाम्पत्याने व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासासाठी लॉस एंजेलिसला जाण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली होती, परंतु खंडपीठाने स्पष्ट केले की भरमसाठ सुरक्षा ठेवीशिवाय हा प्रवास करता येणार नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण? –

हे प्रकरण ऑगस्टमध्ये उघडकीस आले. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​संचालक आणि व्यावसायिक दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल केली. कोठारी यांच्या विधानानुसार, या घटना २०१५ ते २०२३ दरम्यान घडल्या. त्यांनी दावा केला की  कुंद्रा दाम्पत्याने त्यांची कंपनी  बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडसाठी ७५ कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते, जी लाईफस्टाईल उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

कोठारीने नेमका काय आरोप केलाय? -

 सुरुवातीला हे १२  टक्के व्याजदराचे एक कर्ज मानले जात होते. मात्र, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांना ते गुंतवणुकीत रूपांतरित करण्यास तयार केले. शिवाय,  मासिक परतावा आणि मूळ रकमेची पूर्ण परतफेड करण्याचे आश्वासन दिले होते. कोठारी यांनी दावा केला की, त्यांनी एप्रिल २०१५ मध्ये ३१.९५ कोटी रुपये आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये २८.५३ कोटी रुपये हस्तांतरित केले. आता ते म्हणतात की हे पैसे व्यवसाय विस्ताराऐवजी वैयक्तिक खर्चासाठी वापरले गेले.

प्रदीर्घ चौकशी आणि लुकआउट सर्कुलर -

सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दोघांविरोधात एक लुकआउट सर्कुलर जारी केले, ज्यामुळे त्यांना पूर्व परवानगीशिवाय देश सोडण्यास बंदी घातली गेली. मागील आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीची चार तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली होती. मात्र अद्यापपर्यंत तिच्या सहभागाची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Latest Marathi News Live Update : माणुसकीची भिंत २०२५ उपक्रमाची सुरुवात

SCROLL FOR NEXT