पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते.
पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते.  
मुंबई

पालघर पंचायत समितीवर भगवा

सकाळ वृत्तसेवा

पालघर  ः पालघर पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी बुधवारी बोईसरच्या टीमा हॉलमध्ये उत्साहात झाली. मतमोजणी अखेर २३ जागा जिंकून शिवसेनेने पालघर पंचायत समितीवर भगवा फडकवला.

बुधवारी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली होती. मतमोजणी अखेर पंचायत समितीच्या ३४ जागांपैकी २३ जागांवर विजय मिळवून शिवसेनेने पालघर पंचायत समितीवर अपेक्षेप्रमाणे भगवा फडकवला.

पंचायत समितीच्या ३४ जागांपैकी २३ जागी शिवसेना, बहुजन विकास आघाडी चार, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, मनसे एक आणि दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पालघर पंचायत समितीवर शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. पालघर पंचायत समितीत मनसेने खाते उघडले असून त्यांचा एक सदस्य निवडून आला आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य सुरेश तरे नवघर घाटीम पंचायत समिती गणातून पंचायत समितीच्या सदस्यपदी निवडून आले आहेत. पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे आणि पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील दुसऱ्यांदा पंचायत समितीवर निवडून आले आहेत. मावळत्या पंचायत समितीत बहुजन विकास आघाडीची सदस्य संख्या १० होती; परंतु या निवडणुकीत फक्त चार सदस्य निवडून आले आहेत. भाजपच्या पंचायत समिती सदस्यांमध्ये निम्म्याने घट झाली असून फक्त दोन सदस्य निवडून आले आहेत.
 

पालघरमध्ये राष्ट्रवादीची पाॅवर वाढली 
 पालघर जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पावर वाढळी असून भाजप, शिवसेने आणि बविआला मात्र निवडणुकीत फटका बसल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसत आहे. काँग्रेस आणि माकपने मात्र आपल्या जागा राखण्यात यश मिळविले आहे.  मंगळवारी (ता.७) झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. त्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना पुढे असली, तरी पक्षाच्या तीन जागा यंदा कमी झाल्या आहेत, तर गेल्यावेळी एक नंबरला असलेल्या भाजपच्या नऊ जागा कमी झाल्या आहेत. बविआला १० जागांवरुन चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT