Ravindra-Waikar sakal media
मुंबई

ईडीच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ईडीनं वायकर यांची काल सात तास चौकशी केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचा आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं (ED) काल (मंगळवार) सात तास चौकशी केली. या चौकशीनंतर वायकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला तसेच ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही ते म्हणाले. हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात होण्यापूर्वी विधानभवनाबाहेर (State Assembly) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ईडीच्या चौकशीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. (Shiv Sena MLA Ravindra Waikar first reaction after ED inquiry)

वायकर म्हणाले, "माझी सात तास वैगरे काही चौकशी झालेली नाही. त्यांनी मला चौकशीसाठी बोलावलं होतं, ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर जाताना मी रिलॅक्स होतो. ज्या पद्धतीनं त्यांनी प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांना मी उत्तर दिली. त्यांनी जे जे प्रश्न विचारले जे जे पेपर्स मागितले ते मी देऊन टाकले आहेत"

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर केलं भाष्य

वायकर हे मुख्यमंत्र्याचे बिझनेस पार्टनर आहेत त्यामुळं वायकरांच्या चौकशीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही वेळ येणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना वायकर म्हणाले, "किरीट सोमय्या हा केवढा मोठा मनुष्य आहे, तो काय सांगेल कोणाला आदेश देईल काय सांगू शकत नाही. सोमय्यांनी काहीही सांगितल्यानंतर जर आम्हाला ईडीला बोलवायचं असेल तर बोलावतील. ईडीसोबत आमची कुठलीही लढाई नाही. त्यांनी जी प्रश्न विचारले त्याची उत्तरं देणं माझं कर्तव्य होतं ते मी केलं. पुन्हा ईडीनं नोटीस पाठवली तर पुन्हा त्याला सामोरं जाईन"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्दीचा संताप! गोळ्या झाडून पळालेल्या आरोपींना गाठलं अन् ठेचून मारलं; तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ

Dilip Walse Patil : “आदर्शगाव गावडेवाडीने एकजुटीने पुढे चला; निधी कमी पडू देणार नाही-माजी मंत्री दिलीप वळसे पाटील!

त्यांना बोलायची हिम्मत कशी झाली? ती व्यक्ती जी पर्वतासारखी धर्मेंद्रंच्या पाठीशी राहिली; शेवटच्या श्वासापर्यंत ती तिथेच होती

Khamgaon News : खामगाव–जलंब रेल्वे मार्गावर पाण्याची टाकी कोसळली; विद्युत तार तुटल्याने वाहतूक ठप्प!

Uruli Kanchan News : उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; ९९० बालके जन्मनोंद–आधारपासून वंचित!

SCROLL FOR NEXT