मोखाडा ः आनंदोत्सव साजरा करताना शिवसेनेचे विजयी उमेदवार आणि पदाधिकारी.  
मुंबई

मोखाडा पंचायत शिवसेनेच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत मोखाडा पंचायत सामितीच्या सहापैकी पाच जागा जिंकत शिवसेनेने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे, तर जिल्हा परिषदेच्या खोडाळा या एकमेव गटासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या कुसुम झोले यांनी शिवसेनेच्या दमयंती फसाळे यांच्यावर १४३ मतांनी विजय मिळवला आहे.

मोखाड्यातील आसे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हबीब शेख, तर पोशेरा गटातून भाजपच्या राखी चोथे बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपने मोखाड्यातील जिल्हा परिषदेच्या दोन जागा मिळवत वर्चस्व सिद्ध केले.   

मोखाड्यात सहा पंचायत समिती आणि तीन जिल्हा परिषदेच्या जागांसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत दोन जिल्हा परिषदेच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या. यानंतर उर्वरित एका खोडाळा जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या कुसुम झोले यांचा १४३ मतांनी विजय झाला आहे, तर गेल्या २० वर्षांपासून मोखाडा पंचायत समितीवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेने सहापैकी पाच जागांवर विजय मिळवत विजयी परंपरा कायम ठेवली. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला; मात्र, जिल्हा परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेला हार पत्करावी लागली. 

जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार          
हबीब शेख (राष्ट्रवादी) 
राखी चोथे (भाजप)
कुसुम झोले (भाजप)

पंचायत समिती 
प्रदीप वाघ (शिवसेना) 
आशा झुगरे (शिवसेना) 
सारिका निकम (शिवसेना) 
भास्कर थेतले (शिवसेना) 
युवराज गिरंधले (शिवसेना) 
लक्ष्मीबाई भुसारा (राष्ट्रवादी) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT