Sambhaji Brigade  
मुंबई

Sambhaji Brigade Melava: शिवसेना-संभाजी ब्रिगेडचा होणार मेळावा; आजच्या बैठकीत झाले महत्वाचे निर्णय

शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांचा एकत्रित मेळावा पार पडणार आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत इतरही अनेक बाबींवर महत्वाच्या चर्चा झाल्या. (ShivSena and Sambhaji Brigade will taken Melava Imp decisions were taken at Shiv Sena Bhavan meeting)

या बैठकीबाबत माहिती देताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, संपूर्ण देश सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे, त्यामुळं मुलभूत प्रश्नांकडं दुर्लक्ष करुन सत्ताधारी पक्ष सातत्यानं कुठल्याही विषयाला राजकीय रंग देणं आणि भ्रम निर्माण करण्याचं काम करत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत असं ठरलं की, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घ्यायचा. या मेळाव्यात गोरगरिब जनतेचे, अस्मितेचे, भल्याचे, प्रगतीचे आणि न्याय प्रश्न घेऊन एकत्र पुढं जायचं ठरवलं आहे.

एकत्रित मेळावा होणार

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये मेळावा होणार आहे. पण त्यापूर्वी पहिल्यांदा पदाधिकाऱ्यांची एक बैठक होईल त्यानंतर ऑगस्टमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा मुंबईत पार पडेल, अशी माहिती सावंत यांनी दिली.

दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीनंतर वर्षभरानंतर आज बैठक पार पडली. आजच्या बैठकीचं मुख्य प्रयोजन हे महाराष्ट्राचं हीत समोर ठेऊन झाली. भाजपच्या हुकुमशाहीपूर्ण कारभाराला विरोध करायचं हे या बैठकीत निश्चित झालं आहे, असं यावेळी संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर मनभरे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT