Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shinde  esakal
मुंबई

Shivsena : ऐन निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का; 'या' नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कांदिवली पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २८, हनुमान नगर येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनीच हंडारे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना राजकीय वाचचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांच्या पाठोपाठ आता हुंडारेही शिंदे गटात प्रवेश केला आहेत.

आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. त्यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वागत केले. हनुमान नगर परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या सहयोगाने हे प्रश्न नक्की सोडवू अशी यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाम ग्वाही दिली. एका पाठोपाठ नगरसेवक आता शिंदे गटात माजी नगरसेवक दाखल होवू लागले आहेत. पालिका निवडणुक जवळ येईल तसे माजी नगरसेवक पक्षांतर करू लागले आहेत.

अजून प्रभागांची फेररचना आणि आरक्षण पडणार आहे. त्याच ज्यांच्या पत्ता कापला जाईल. त्या नगरसेवकांची पळवा पळवी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी नगरसेवक सावध पावले टाकत आहेत असे दिसते. हुंडारे यांच्या पक्ष प्रवेशा वेळी शिवसेना सचिव अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT