anandrao adsul e sakal
मुंबई

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना हलवलं दुसऱ्या रुग्णालयात

अडसुळांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती होती.

वैदेही काणेकर

मुंबई: शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (anandrao adsul) यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लाईफ लाईन रुग्णालयातून (life line hospital) त्यांना SVS रुग्णालयात हलवले आहे. गोरेगाव येथील SVS रुग्णालयात आनंदराव अडसूळ यांना हलवले आहे. सोबत कुटुंबीय आणि काही ED चे अधिकारी असल्याची माहिती आहे.

सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा (city co operative bank scam) प्रकरणात ईडीच्या (ED) रडारवर असलेले माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ (anandrao adsul) यांनी ईडीविरोधात हायकोर्टात (High court) याचिका दाखल केली आहे. ED नं दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचा संबंध आनंदराव अडसूळ यांच्याशी जोडला जात आहे.

अडसुळांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती होती. मात्र ईडीचे अधिकारी तिथंच ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती होती. या प्रकरणी न्यायालयाकडे दुपारी तातडीची सुनावणी घेण्याबाबत याचिका दाखल केली आहे.

अडसुळांवर काय आरोप आहे?

'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT