Narayan-Rane-Sanjay-Raut
Narayan-Rane-Sanjay-Raut 
मुंबई

नारायण राणेंच्या मंत्रिपदावर काय म्हणाले संजय राऊत? वाचा...

विराज भागवत

शिवसेनेला टक्कर देण्यासाठी राणेंना मंत्रिपद? या प्रश्नाचेही राऊतांनी दिलं उत्तर

मुंबई: पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) पहिल्या क्रमांकाची शपथ घेतली ती कोकणचे नारायण राणे (Narayan Rane). त्यांच्यावर सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. त्यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपलं मत व्यक्त केलं. "नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (Maharashtra Ex-CM) होते. त्यांनी विविध कालखंडात अनेक मंत्रिपदे (State Ministry) भुषवली आहेत. त्यांची सुरूवात शिवसेनेपासून (Shivsena) झाली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये (Congress) गेले आणि आता त्यांनी भाजपकडून (BJP) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भाजपने शिवसेनेचे आभार मानायला हवेत. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायण राणे यांची राजकीय उंची पाहता त्यांना तितकं महत्त्वाचं खातं मिळालेलं नाही. पण तरीही त्यांनी देशाचा आणि राज्याच्या विकासासाठी काम करावे ही अपेक्षा", असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. (Shivsena Sanjay Raut Reaction on Narayan Rane as Cabinet Central Minister in PM Modi BJP Government)

"नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणं ही चांगली गोष्ट आहे. सध्या ही व्यक्तिगत टीका करण्याची वेळ नाही. मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांना संधी मिळाली आहे. नक्कीच ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याकडे जे मंत्रालय आहे, त्यातून ते नवीन रोजगार निर्मितीचं काम करतील. महाराष्ट्रात काही नवीन उद्योग ते आणतील अशी आमची अपेक्षा आहे", असेही ते म्हणाले.

Narayan Rane

राणेंमुळे शिवसेनेला फटका बसेल?

"शिवसेनेला फटका बसावा म्हणून राणेंना मंत्रिपद दिलं असेल तर तो कॅबिनेट मंत्रिपदाचा अपमान ठरेल. केंद्रीय मंत्र्यांनी देशासाठी काम करायचं असतं. शिवसेनेला फटका देण्यासाठी त्यांना संधी दिली असेल तर हे घटनाविरोधी आहे. असं होत असेल ते चुकीचं आहे. मंत्रिपद हे राज्याचा किंवा देशाचा कारभार करण्यासाठी असतं. एखाद्या पक्षाविरोधात लढावं म्हणून एखाद्या व्यक्तीला मंत्रिपद दिलं गेलं तर मंत्रिपदाची प्रतिष्ठा राहणार नाही", अशा शब्दात राऊतांनी रोखठोक वक्तव्य केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT