मुंबई

आता बास, 48 तासानंतर शिवसेना अॅक्टीव्हेट करणार आपला प्लान 'B'

सकाळ वृत्तसेवा

भाजपकडून प्रतिसादासाठी पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पुढच्या 48 तासात भाजपकडून प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' वापरणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप सोबत 50-50 च्या सूत्रावर पाणी फिरलं तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी सोबत  हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्याचा प्लान 'B' आहे. कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीला बाहेरून पाठींबा देण्यार अशी सूत्रांची माहिती आहे. 

यात आता शिवसेना आणि भाजपात संवाद बंद असल्याची शिवसेनेची भावना आहे. त्यामुळे येत्या 48 तासात जर भाजपकडून कोणताही प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' चं रुपांतर प्लान 'A' मध्ये करू शकतो असं आता सूत्रांकडून समजतंय. 

युतीच्या राजकारणात मोठ्या भावाचं स्थान गमावलेली आणि मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना नवा घरोबा करण्याची शक्यताय. विशेष म्हणजे यासाठी 1995 चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील, असं बोललं जातंय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. यानंतर महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात, असं सूत्रांकडून समजतंय.  

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद ?

राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यानं म्हटलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, अशीही चर्चा झाल्याचं कळतंय. 

निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटलेत. तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. विशेष म्हणजे महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढतोय. अशातच आता नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागलेत.

WebTitle : shivsena will activate their plan B fi they did not receive any communication from BJP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Paternity Leave: CM विजय यांचा क्रांतिकारी निर्णय; आता बाळाच्या जन्मावेळी वडिलांनाही मिळणार १५ दिवसांची सुट्टी

IPL 2027 Trade: ... तर हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स संघात असता, पण दोन खेळाडूंमुळे फिस्कटली डील

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Latest Marathi News Live Update: ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदमांचा नवा दावा; 'माझ्याकडे आणखी...'

SCROLL FOR NEXT