Shivsena Esakal
मुंबई

Shivsena: युवासेना सचिव दुर्गा भोसले यांचं निधन; ठाण्यातील मोर्चामध्ये चालत असतानाच...

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात देखील सहभागी झाल्या होत्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकीय वर्तुळातून दु:खद घटना समोर आली आहे. युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 30 व्या वर्षी दुर्गा भोसले यांच निधन झालं आहे. त्यांच्या मागे पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

शिवसेना(ठाकरे गट) युवासेनेच्या कर्तुत्वान महिला अशी दुर्गा भोसले यांची ओळख होती. दुर्गा भोसले या काल ठाण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात देखील सहभागी झाल्या होत्या. मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत त्या सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या.

जनआक्रोश मोर्चात चालत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच युवासेना पदाधिकार, कार्यकर्ते यांच्यासह सर्वांनाचा मोठा धक्का बसला. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या मुंबईतील राहत्या घरातून संध्याकाळी 6 वाजता निघणार आहे. तर अंत्यसंस्कार बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे होणार आहेत.

आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाची वार्ता ऐकून धक्का बसला. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवा सैनिक आम्ही आज गमावला. युवासेनेतलं हे दु:ख व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. ओम शांती, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT