मुंबई

माळशेजच्या घाटरस्त्यावर अल्पवयीन मुलीबाबत घडला धक्कादायक प्रकार... पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

मुरलीधर दळवी - (बातमीदार - माळशेज )


मुरबाड ः कल्याण माळशेज घाट रस्त्यावर मोरोशी गावाजवळ शनिवारी (ता. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास मोटरसायकलवरून एक तरुण व अल्पवयीन मुलगी जात असताना त्यांची मोटार सायकल अडवून तरुणाला झाडाला बांधून मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरोधात टोकावडे पोलिस ठाण्यात विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे खंडू मेंगाळ, नवसू भला, बंडू भला (सर्व राहणार आवळीची वाडी) व बाळू दत्तू वाघ (रा.मोरोशी) अशी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, माळशेज घाटातून मुंबईकडे मोटरसायकलवरून एक तरुण व अल्पवयीन मुलगी जात होते. त्यांना मोरोशी गावाजवळ चार जणांनी अडविले व तरुणाला झाडाला बांधून मुलीला झुडपात नेले. तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेतली व मोरोशी गावात जाऊन ग्रामस्थांना माहिती दिली. लोकांनी घटनास्थळी धाव घेतली असता लोकांना ती मुलगी निर्वस्त्र अवस्थेत आढळली. त्यांनी तिला स्वतःचे कपडे देत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवली. उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना हा सामूहिक विनय भंगाचा प्रकार असल्याचे सांगितले आहे.

The shocking incident happened to a minor girl on Malshej Ghat Road

-----------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT