mall.
mall. 
मुंबई

मॉलमधील दुकानदाराने केली न्यायालयाकडे चक्क 'ही' मागणी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनला जवळपास अडीच महिने होत आले असून केंद्रासह राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने शिथिलता मिळत आहे. मात्र, सुधारित नियमावली नुसार राज्यातील मॉल, चित्रपटगृहांना अद्यापही बंदी कायम आहे. दुसरीकडे सरकारने महसुलवाढीसाठी मद्याची होम डिलिव्हरी सुरु केली. त्यानुसार मद्याची ऑनलाईन विक्री करून त्याची होम डिलिव्हरी सुरु झाली. 

राज्यातील मॉल सुरु करण्यास सध्यातरी मनाई असली तरी  मॉलमध्ये असलेल्या वाईन शॉपना देखील होम डिलिव्हरी मार्फत मद्यविक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट येथे असलेल्या सीआर-2 मॉलमध्ये एक मद्याचे दुकान आहे. हे दुकान मॉलमध्ये असले तरी त्याला येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे. त्यामुळे मॉल बंद ठेवूनही ऑनलाईन पद्धतीने होम डिलिव्हरीद्वारे मद्यविक्री करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी दुकानमालकाने केली आहे. त्यांनी एकल दुकान या गटात हे दुकान येते, असा दावा केला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने ही मागणी अमान्य केली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये याचिकेवर सुनावणी झाली. महापालिका आणि राज्य सरकारने याबाबत बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. 5) रोजी निश्चित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT