Siddhivinayak Trust donates ₹10 crore to help Maharashtra recover from flood devastation.

 

esakal

मुंबई

Siddhivinayak Trust Donation : श्री सिद्धिविनायक ट्रस्टने अतिवृष्टीच्या संकटातून महाराष्ट्राला सावरण्यासाठी दिले १० कोटी रुपये!

Maharashtra Flood Relief : प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करत आहेत.

Mayur Ratnaparkhe

Siddhivinayak Trust’s Major Contribution for Maharashtra Flood Relief: महाराष्ट्रावर सध्या अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं आहे. हजारो एकरावरील शेतजमिनींचं प्रचंड नुकसान झालं आहे. उभी पीक वाहून गेली आहेत, यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे. तर सरकारही युद्धपातळीवर कामाला लागलेलं आहे. तर, मदतीचाही ओघ सुरू झालेला आहे.

प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करत आहेत. दुसरीकडे सर्वच आमदार, मंत्री नेते हे नुकसानाग्रस्त भागाचीं पाहणी करत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर देखील आला आहे. परिणामी केवळ शेतीचेच नाहीतर, राहत्या घरांचं गुरा-ढोरांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहे.

अशावेळी या संकटातून सावरण्यासाठी सरकारकडून होईल ती मदत केली जात आहे. तर अनेकजण मुख्यमंत्री सहायता निधीतही मदत निधी जमा करत आहेत, अनेक सेलिब्रिटींनी मदतीसाठी आवाहनही केले आहे. याच पार्श्वभूमीववर आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल दहा कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री सिद्धिविनायक ट्रस्टने त्यांच्या अधिकृत  फेसबुक पेजवर याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, महाराष्ट्र राज्यातील विविध भागांत गेलेल्या काही दिवासांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात काय घडलं ? जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT