मुंबई

'स्लॅपींग थेरपी', आता कानाखाली मारल्याने मिळेल ग्लोईंग त्वचा; वाचा भन्नाट बातमी...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तुम्हाला कधी कुणी कानाखाली मारली आहे का? अशावेळी प्रचंड राग येतो ना? मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कानाखाली मारल्यामुळे आता तुमचाच फायदा होणार आहे. स्वतःच्याच कानाखाली मारून तुम्ही तुमची स्किन जास्त छान आणि आणखीन ग्लोईंग बनवू शकणार आहात.

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आपण कायमच कामात खूप बिझी असतो. यात आपल्याला खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. यामुळे आपली स्किन अशक्त आणि खराब होण्याची शक्यता असते. काही महिला त्वचा सुंदर दिसायला हवी यासाठी पार्लरमध्ये जाऊन अनेक प्रकारचे फेशिअल आणि विविध थेरपी करत असतात. मात्र त्यांना फायदा होतोच असं नाही. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही स्वतःच्या गालावर मारून आपली स्किन चांगली ठेऊ शकणार आहात. विश्वास बसत नाहीये ? मात्र हे खरं आहे. कोरियन एक्स्पर्टकडून याबाबत सांगण्यात आलंय. एक्स्पर्टकडून याला 'स्लॅपींग थेरपी' असं नाव देण्यात आलंय. 

काय आहे 'स्लॅपींग थेरपी':

आपल्या चेहऱ्यावर ऊर्जा रेषा असतात. या ऊर्जा रेषांच्या मदतीनं आपल्या चेहऱ्यावर ग्लो राहण्यासाठी मदत होत असते. मात्र कालांतरानं या ऊर्जा रेषा बंद होतात. फेशिअल करताना चेहऱ्यावर आणि गालावर मारल्यामुळे या ऊर्जा रेषा उघडल्या जातात आणि तुमच्या स्किनला याचा फायदा होतो. यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं. तुमच्या चेहऱ्यावर यामुळे ग्लो येतो आणि स्किन सॉफ्ट राहते. अमेरिकेत राहणारे मसाज थेरेपिस्ट 'गम पुक्कलुनुन' यांनी या थेरपीचा शोध लावला आहे. 

त्यामुळे आता आपल्या गालावर मारा आणि तुमची स्किन तुळतुळीत ठेवा.    

Slap on your face and keep your skin glowing read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

FIFA World Cup: स्पेनच्या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाच्या २०२७ चा वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा वाढल्या; जाणून घ्या भन्नाट कनेक्शन

Live Updates Marathi : लोकआयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Kolhapur Cricket Stadium : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा; पहिले डिजाईन आले समोर, राज्य शासन-क्रिकेट असोसिएशनमध्ये करार

SCROLL FOR NEXT