मुंबई

एसटीच्या सवलती हव्या; तर स्मार्ट कार्ड हवेच! वाचा काय आहे बातमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळाच्या 29 प्रकारच्या सवलतींसाठी संबंधित प्रवाशांना 1 जानेवारीपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले होते; मात्र स्मार्ट कार्डची आवश्‍यक प्रमाणात नोंदणीच झालेली नाही. तसेच सामान्य प्रवासी आणि लोकप्रतिनिधींनी या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री सुभाष देसाई यांनी स्मार्ट कार्ड योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 

एसटीतर्फे 29 विविध योजनांसाठी प्रवासभाड्यात सवलती दिल्या जातात. त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी सवलतीधारक प्रवाशांसाठी एसटीने स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे; मात्र या योजनेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. एसटीच्या अनेक बसस्थानक, आगारांमध्ये संबंधित कंपनीकडून स्मार्ट कार्ड नोंदणीचे अपुरे साहित्य दिल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय प्रवाशांची अपेक्षित नोंदणी झाली नाही. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी नागपूर अधिवेशनात केली होती. त्यानुसार 1 एप्रिलपासून राज्यात स्मार्ट कार्ड योजना लागू होईल. 

सध्या 30 लाख 97 हजार 726 सवलतीधारकांची नोंद झाली आहे. यातील ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी व व्याधीग्रस्तांना 31 डिसेंबरपर्यंत स्मार्ट कार्ड मिळवणे आवश्‍यक होते; मात्र नोंदणीच्या तुलनेत स्मार्ट कार्ड वितरण झाले नसल्याचे आढळले. त्यामुळे आता मासिक, त्रैमासिक पासधारकांना 15 फेब्रुवारीपासून, तर विद्यार्थ्यांना 1 जूनपासून स्मार्ट कार्ड सक्तीचे असेल. दिव्यांगांसाठी अद्याप ही योजना लागू झालेली नाही. 

एसटी प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 1 एप्रिलपूर्वी सर्व सवलतीधारकांची नोंदणी आणि स्मार्ट कार्ड वितरण पूर्ण करण्याची कार्यवाही केली जात आहे. 
- सुभाष देसाई, मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT