मुंबई

रॅट ब्ल्यू पॅडवर चिटकला चक्क साप! कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

मिलिंद तांबे

मुंबई : उंदीर पकडण्यासाठी लिफ्ट मध्ये ठेवलेल्या रॅट ब्ल्यू पॅड वर चक्क साप चकटल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड येथील एका कंपनीच्या आवारात घडला. त्यामुळे कामगारांमध्ये एकच धावपळ झाली.  मुलुंड येथील एल बी एस मार्गावरील एका खासगी कंपनी मध्ये उंदरांचा उपद्रव वाढला आहे. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्री उशिरा कंपनीच्या लिफ्ट मध्ये उंदीर पकडण्याचे रॅट ब्ल्यू पॅड ठेवले. सकाळी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने लिफ्ट मध्ये येऊन जे पाहिले ते पाहून त्याची बोबडीच वळाली. कारण उंदीर पकडण्यासाठी लिफ्ट मध्ये ठेवलेल्या रॅट ब्ल्यू पॅड वर चक्क साप चिकटला होता.

कंपनी मधील हा प्रकार कामगार नरेश राणे यांनी अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लांट एण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी - मुंबई (पॉज-मुंबई) या प्राणी मित्र संघटनांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. एसीएफ पॉज-मुंबई चे स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन फूट लांबीचा धामण साप रॅट ब्ल्यू पॅड ला चिकटलेला दिसला. प्राणी मित्रांनी धामण साप बिन विषारी असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

       एसीएफ पॉज-मुंबई संस्थेचे स्वयंसेवक हसमुख वळंजू यांनी ब्ल्यू पॅड ला चिटकलेल्या सापाला घेऊन थेट पशु वैद्यकीय दवाखाना गाठला. तेथे पशु वैद्यकीय डॉक्टर राहुल मेश्राम यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी पॅड ला चिटकलेल्या सापाला सुरक्षित वेगळं केलं. त्यानंतर सापाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. तासाभराने साप सुदृढ असल्याचे निदान झाल्यानंतर वनविभागाच्या मदतीने धामण सापाला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आल्याची माहिती एसीएफ पॉज-मुंबईचे संस्थापक तथा मुंबई शहर चे मानद वन्यजीव रक्षक सुनीष सुब्रमण्यन यांनी दिली. 

The snake stuck to the rat blue pad in mulund

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT