...हा नियम पाळा, नाही तर पुढचा नंबर तुमचा! 
मुंबई

...हा नियम पाळा, नाही तर पुढचा नंबर तुमचा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाची दहशत असतानाही काही बेशिस्त नागरिक मास्क न बांधता बाहेर फिरत आहेत. मास्क न लावणाऱ्या 1927 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमणे, कलम 188 च्या उल्लघंनाबद्दल 10 हजार 839 जणांवर गुन्हे नोंदवल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी आहे. गरजेव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमू नका, तोंडावर मास्क बांधणा असे आवाहन नागरिकांना सतत केले जात आहे. परंतु, अनेक बेजबाबदार नागरिक या नियमांची पायमल्ली करत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जाते. मुंबईत आतापर्यंत 300 हून अधिक कोरोनाबाधितांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. 

पोलिसांनी मास्क न बांधणाऱ्यांविरोधात 18 एप्रिलपासून कारवाई सुरू केली. आतापर्यंत 1927 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. मास्कविना फिरणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण पश्‍चिम आणि मध्य मुंबईत आढळले. मास्क न बांधणाऱ्या 15 जणांवर रविवारी पोलिसांनी कारवाई केली. प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहने होत असून आणि समाजसेवी संस्थांनी मास्कचे वाटप करूनही बेजबाबदारपणे वागणाऱ्यांना पोलिस कारवाईचा धाक दाखवत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

पोलिसांचा दंडुका 

  • गुन्हे दाखल : 10 हजार 839 
  • अटक, जामिनावर सुटका : 6700 
  • शोध सुरू : 1343 
  • नोटिसा : 2796 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT