संग्रहित छायाचित्र 
मुंबई

वंदे भारत... परदेशांतून 1972 देशवासीयांची घरवापसी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत राज्यातील 1972 नागरिक परदेशांतून परतले आहेत. सर्वांना क्वांरटाईन केंद्रांत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. परदेशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य सरकारने माणुसकीच्या नात्याने केल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले. 

हे वाचलं का? : मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार इतक्या लाखांची मदत

वंदे भारत अभियानांतर्गत 10 देशांतून 13 विमानांनी सर्व प्रवासी महाराष्ट्रात आले. त्यांपैकी 822 नागरिक मुंबईतील, 1025 जण उर्वरित महाराष्ट्रातील आणि 125 व्यक्ती अन्य राज्यांतील आहेत. परदेशांत अडकलेले आणखी काही नागरिक 27 विमानांनी महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मोठी बातमी : मुंबईत कोरोनाचा गुणाकार सुरूच 

क्वारंटाईनची व्यवस्था 
मुंबईतील प्रवाशांची क्वारंटाईनची व्यवस्था हॉटेलांत करण्यात आली असून, इतर जिल्हे व राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. वेगवेगळ्या राज्यांनी स्वीकारण्यास नकार दिलेल्या नागरिकांना मुंबईतच संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे.

       कुठून किती प्रवासी... 

  • लंडन (इंग्लड) : 653 
  • सिंगापूर : 243
  • मनिला (फिलिपिन्स) : 150
  • सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) : 107
  • न्यूयॉर्क (अमेरिका) : 208
  • शिकागो (अमेरिका) : 195
  • क्वालालंपूर (मलेशिया) : 201
  • आदिस अबाबा (इथिओपिया) : 78
  • काबूल (अफगाणिस्तान) : 12
  • ढाका (बांगलादेश) : 107 
  • मस्कत (ओमान) : 16
  • कुवेत : 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Video: नवीन चलनी नोटांनी भरलेले वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा मृत्यू, ३० जखमी, पण लोकांना दिसल्या फक्त नोटा

अग्रलेख : सत्तेची ‘नशा’ उतरवली

Panchang 28 February 2026: आजच्या दिवशी हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

T20 WC, Semi Final Fixture : इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचला, पण कोणाला भिडणार? वानखेडे स्टेडियमवर कल्ला होणार... जाणून घ्या समीकरण

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २८ फेब्रुवारी २०२६ ते ६ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT