मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावरुन राज्यात सध्या रणकंदन सुरु आहे. विरोधकांनी सडकून टीका केल्यानंतर यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात पाकिस्तान आहे का? असा सवाल केला होता. पण आता त्यांच्या या विधानाला शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी उलट सवाल केला आहे. मग महाराष्ट्र पाकिस्तान आहे का? अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं आहे. (So is Maharashtra Pakistan Aditya Thackeray slams to Devendra Fadnavis)
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मग महाराष्ट्र पाकिस्तान होता का? इथून तो प्रकल्प पळवून लावलात. महत्वाची गोष्ट हीच आहे की, आमच्या मुलांची यात काय चूक? मूळ मुद्दा हा आहे की गुंतवणूक कुठेही जाऊ दे. पण गुजरातचे जे कोणी उद्योग मंत्री असतील त्यांचं मी कौतुक करतो की, आम्ही पाठपुरावा करत होतो तेव्हा इथं तो प्रकल्प जुळणार होता. पण महाराष्ट्रातील सरकार पडल्यानंतर एका महिन्यात हा प्रकल्प तिथं खेचला.
दरम्यान, फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना आपल्याला आश्चर्य वाटतं असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस म्हणाले, "मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राची तुलना ते पाकिस्तानशी करत आहेत. एकदा कंगना राणावत असंच काही बोलल्या होत्या तर किती गजहब झाला होता. पण आदित्य ठाकरे देखील तीच भाषा करणार असतील तर मला याचं आश्चर्य वाटतंय"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.