मुंबई

म्हणून तिने कोर्टात जाऊन केली वकिलांनाच मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी -  जुन्या वादाच्या रागातून एका महिलेने थेट न्यायालयात जाऊन वकिलाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना भिवंडी न्यायालयात बुधवारी (ता.26) सायंकाळी घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात दोघा आरोपीविरोधात परस्पर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वकील नवशाद सय्यद असे महिलेकडून मारहाण झालेल्या वकिलाचे नाव असून सदर वकिलाचे आठ महिन्यांपूर्वी 33 वर्षीय महिलेच्या पतीशी वाद झाला होता. त्यावेळी महिलेच्या पतीने पाच ते सहा इसमांसोबत वकील नवशाद सय्यद यांच्याशी वाद केला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गंभीर दखल घेत सदर महिलेच्या पतीस पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी हद्दपार केले आहे.

या गोष्टीचा राग मनात धरून हद्दपार आरोपीची महिला या वकिलाच्या शोधावर होती, अखेर बुधवारी सायंकाळी तिने थेट भिवंडी न्यायालयात येऊन वकील नवशाद यास मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी वकील नवशाद यांचा साथीदार सहकारी वकील आला असता त्यासदेखील या महिलेने मारहाण केली. सदर प्रकाराबाबत महिला व वकील यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन एकमेकांविरोधात परस्पर तक्रारी दिल्याने पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसोझा करीत आहेत.   

web title : So she went to court and beat the lawyers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT