मुंबई

शिवडीमधील सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर; 25 हजार लोकांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अनेक सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये राहिवाश्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून  ज्या गरजूंना अन्न-धान्याची गरज आहे त्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे.

मुंबईतील शिवडी, परळ, प्रभादेवी या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रहिवाशांना आपल्या आरोग्य तपासणीची गरज वाटत असली तरी खासगी दवाखाने बंद असल्याने त्यांना तपासणी करता येत नाही. राहिवाश्यांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष नाना आंबोले यांनी पुढाकार घेऊन मदत सुरू केली आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. थर्मल मशीन आणि पल्स ऑक्सिमीटर ने सज्ज पथक बनवण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून लोकांची तापासणी करण्यात येत आहे. 

परळ मधील श्री कृष्ण नगर बिल्डिंग आज अडीच हजार लोकांची तपासणी करण्यात आली. पथकांच्या माध्यमातून लोकांची सर्दी,ताप,खोकला तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येत आहे.  गेल्या 15 दिवसात अश्या प्रकारे आत्तापर्यंत शिवडी विधानसभा परिसरातील 25 हजाराहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवसात या परिसरातील सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. 


मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शिवडी,परळ, प्रभादेवी,लोअर परळ, वरळी उआ परिसरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. मात्र खासगी दवाखाने बंद असल्याने लोकांना आपली तपासणी करून घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्व सोसायट्यांमधी लोकांची तापसणणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाना आंबोले यांनी सांगितले. शिवाय इतर परिसरातील लोकांना आपली तपासणी करून घ्यायची असल्यास पालिकेच्या परवानगीने तिथेही पथकं पाठवून तपासणी करून घेणार असल्याचे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'त्या' जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता का? अजित पवार म्हणाले, ''प्रयत्नांती परमेश्वर...''

Kolhapur : ऊसदराचं आंदोलन चिघळलं, आंदोलकांना पोलिसांची धक्काबुक्की; कारखानदारांवर दडपशाहीचे आरोप, Video Viral

Jewellery Shop Robbery Video : ज्वेलरी शॉप लुटण्यासाठी महिलेने दुकानादारांच्या डोळ्यात फेकलं तिखट, पण तिथंच पकडली गेली अन् मग...

महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणार, अंगावर काटा आणणारा ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : व्हेल माशाची दीड कोटी रुपयांची उलटी जप्त

SCROLL FOR NEXT