Workers Strike Sakal media
मुंबई

मुंबादेवी : ठेकेदाराने पगार न दिल्याने कामगारांचा संप

सकाळ वृत्तसेवा

मुंबादेवी : दक्षिण मुंबईतील (south Mumbai) महानगर टेलिफोन निगम (Mahanagar Nigam Telephone) झोन एकच्या कंत्राटदाराने गेल्या ४ महिने पगार आणि वर्षभराचा कर्मचारी निर्वाह निधी थकविल्याने संतप्त झालेल्या २५० कामगारांनी संपाचे हत्यार (strike update) उपसले आहे. यामुळे महानगर टेलिफोन निगमकडून दूरध्वनी सेवा, इंटरनेट सेवा घेणारी सरकारी, तसेच खासगी कार्यालये अवलंबून आहेत, त्यांचे कामकाम ठप्प होण्याची शक्यता आहे.

महानगर टेलिफोन निगम येथे कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर सीटी टेलिफोन एक्स्चेंज कार्यालय अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने कामगारांची भरती करण्यात आली. हा झोन वनचा ठेका दोन महिने, सहा महिने आणि एक वर्ष असे वेगवेगळे ठेकेदार होते. गेल्या वर्षापासून आलेले ठेकेदार नेहरा कन्स्ट्रक्शन आणि डीपी टेली सिस्टम यांनी कामगारांच्या पगारात कपात केलीच. तसेच कामगारांना कोविड काळात एकही सुट्टी दिली नाही, कोविड काळात एकाचाही विमा काढला गेला नाही, असे कामगारांकडून सांगण्यात आले. पगारासाठी सात महिला कामगारांनी आपण उपोषणाच्या तयारीत असल्याचे सांगितले. ठेकेदार नेहरा कन्स्ट्रक्शन आणि डीपी टेली सिस्टमच्या आर. पी. यादव, जयेश यादव आणि मनोज गुप्ता यांनी फोन केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही.

…तर मनसे आंदोलन करील

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना वेळेत पगार दिला जात नसेल तर मनसे गप्प बसणार नाही. कामगारांना न्याय मिळावा, म्हणून मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा मनसेचे मलबार हिल विभाग अध्यक्ष धनराज नाईक यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT