vrvara rao  
मुंबई

एल्गार परिषद प्रकरणः वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: पुण्यातील एल्गार परिषद प्रकरण व अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले प्रसिद्ध तेलुगू कवी वरावरा राव(81) यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी विशेष न्यायालयाने 2 जूनपर्यंत राव यांचा वैद्यकीय अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. राव यांची तब्येत बिघडल्यानंतर शनिवारी त्यांच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांनी जे.जे. रुग्णालयाने राव यांचा सविस्तर वैद्यकीय अहवाल देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. 81 वर्षीय राव यांना इतरही आजार असल्यामुळे राव यांना जामीन मिळावा, अशी मागणी यापूर्वीच राव यांच्या कुटुंबियांनी केली आहे. 

वरावरा राव हे तळोजा कारागृहात मध्ये असल्याने त्यांना  तळोजा जेलमधून मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भोवळ येऊन अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना काराहातून  हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी राव यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, राव यांची प्रकृती आता स्थिर आहे.

 राव यांनी याप्रकरणी जामिनासाठी अर्ज केला असताना न्यायालयाने 28 मेला तळोजा कारागृहाला वैद्यकीय अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी कारागृह प्रशासनाने अर्ज सादर केला नव्हता. अखेर न्यायालयाने कारागृहाला पुन्हा या अहवालाबाबत आठवण करून दिली आहे. पुणे पोलिसांनी नोव्हेंबर 2018 मध्ये राव यांना अटक केली होती. पुढे फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण राष्ट्रीय तपास पथकाला हस्तांतरीत करण्यात आले होते.

special court asked for medical certificate of varvara rao read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Changes : रामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी वाहतुकीत बदल

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Solapur News : विखे-पाटलांचे कडक आदेश: अधिकाऱ्यांची पळापळ, माढ्यात पाणीच पाणी!

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

SCROLL FOR NEXT