parambir singh sakal media
मुंबई

परमबीर सिंग यांच्याशी संंबंधीत प्रकरणांचा तपास आता 'या' यंत्रणेकडे

उपायुक्तांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटीची स्थापना

अनिष पाटील

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former police Commissioner) परमबीर सिंग (Parambir singh) यांच्यासंबंधी प्रकरणांचा तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. उपायुक्त दर्जाचा अधिकारी या एसआयटीचा प्रमुख असून सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी एसआयटीचा प्रमुख (SIT head officer) तपास अधिकारी असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ( Special investigation team takes the inquiry of parambir singh related cases-nss91)

मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे. हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकारी व बड्या व्यक्तींच्या संदर्भातील असल्यामुळे तपासावर त्याचा परिणाम होऊ नये, तसेच विशिष्ठ वेळेत याप्रकरणांचा तपास होण्यासाठी या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. ही एसआयटी थेट सहपोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील व पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना थेट रिपोर्ट करणार असल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

परबीर सिंग यांच्याविरोधात पहिले प्रकरण मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. फिर्यादी श्यामसुंदर अग्रवाल हा असून ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक आहे.

अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120(ब), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसाकाला 15 कोटींच्या खंडणीसाठी धमकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे.

याशिवाय याप्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाविरोधात जुहू पोलिस ठाण्यात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे. कुख्यात गँगस्टर छोटा शकील याच्याशी संबंध असल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणाचा तपासही एसआयटी करणार आहे. महाराष्ट्र सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला परमबीर सिंह यांची खुली चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बुकी सोनू जालानच्या तक्रारीप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी) तपास करत आहेत.त्यामुळे सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT