मुंबई

‘टेलीआयसीयू’! मुंबईत अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर होणार!

सकाळ वृत्तसेवा



मुंबई : अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचारांची सुविधा तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळणार आहे. त्यासाठी ‘टेलीआयसीयू’ प्रणालीचा वापर होणार आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या सुमारे 75 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे आढळत नाहीत, तर 10 ते 15 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात. सुमारे तीन टक्के गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारांची आवश्यकता असते. त्यासाठी आयसीयू विशेषज्ञांची संख्या वाढवली जात आहे. मेडिस्केप या डॉक्टरांच्या फाऊंडेशनने अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित ‘टेलीआयसीयू’ प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मेडिस्केप फाऊंडेशन जिल्ह्यांतील काही अतिदक्षता विभागांचे व्यवस्थापन करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यासाठी आयसीयूमधील प्रत्येक खाटेवर लावलेल्या मॉनिटरवरील रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचे नियंत्रण ‘टेलीआयसीयू’ प्रणालीद्वारे केले जाईल. त्यानुसार तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाची स्थिती पाहून उपचारांबाबत सल्लाही देणार आहेत. 

'टेलीआयसीयू' सुविधा मुंबईसह ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध केली जाईल. तिची यशस्विता पाहून अन्य जिल्ह्यांतही ही सुविधा सुरू करण्यात येईल. 
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT