Shahid kapoor
Shahid kapoor 
मुंबई

जुहू चौपाटीवर 200 जवानांसह शाहिद कपूरची स्वच्छता मोहिम

दिनेश चिलप मराठे

मुंबई : 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे 24 ला जुहू चौपाटीवर पहाटे 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अनंत चतुर्थी दिवशी झालेल्या गणेश मुर्त्यांच्या विसर्जनानंतर बाहेर आलेले मूर्तिंचे अवशेष, हार, कचरा, निर्माल्याच्या पिशव्या गोळा करण्यात आल्या.

विशेष बाब म्हणजे हिंदी चित्रपट अभिनेता शाहिद कपूर यांनीही मोहिमेत सहभाग घेत अधिकारी वर्ग आणि जवानांसह चौपाटी स्वच्छ केली. वरिष्ठ अधिकारी राजेश रंजन, सतीश खंदारे यांचे मार्गदर्शनाखाली नीलिमा राणी सिंह यांच्या सह आमदार अमित साठे, नगर सेविका रेणु हंसराज, वी.के.चौरसिया, वरिष्ठ कमांडेंट शिप्रा श्रीवास्तव सहित 200 जवान NGO जुहू सोल ऑफ दी सिटी यांच्या सहकार्याने चौपाटीवर मनापासून कार्यरत होते.

शाहिद कपूर यांनी CISF च्या स्वच्छता मोहिमेचे स्वागत करीत देशाच्या सुरक्षेला प्रथम प्राधन्य देत स्वच्छते बाबत आपले प्रथम कर्तव्य समजणाऱ्या सर्व CISF अधिकारी वर्ग आणि जवानांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले. आपला परिसर आणि विभाग स्वच्छ ठेवणे हि प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून ते प्रत्येकाने पार पाडल्यास देश स्वच्छ होण्यास फार काळ वाट पहावी लागणार नाही अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT