Atal Setu sakal
मुंबई

Atal Setu: 'या' कारणामुळे अटल सेतूवरुन लालपरी धावणे कठिण!

अटल सेतूवरील एसटी चालवण्याच्या आव्हानांचे विश्लेषण | Analysis of Challenges of Running ST on Atal Setu

Chinmay Jagtap

नितिन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा

सध्या अटल सेतूवरून लालपरी चालविण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने एसटी महामंडळाने सर्वेक्षण सुद्धा केले आहे. मात्र, एसटी बस अटल सेतूवरुन धावल्यास मुंबई आणि उपनगरातील तब्बल २२ थांबे हुकणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीसोबत एसटीच्या प्रवासी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न महामंडळाचा आहे.

नुकतेच अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण झाले आहे. समुद्रात बांधलेल्या या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई शहरातील प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आला आहे. एसटी प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा यासाठी पहिल्या टप्प्यात ई शिवनेरी अटल सेतूवरुन चालवण्याचा विचार एसटी महामंडळाने केला.

या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. तो अहवाल महामंडळाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु शिवनेरी ही प्रामुख्याने दादर-पुणे,स्वारगेट या मार्गावर धावते. मात्र दादर ते कळंबोली पर्यंत अनेक प्रवासी शिवनेरी बस पकडतात. त्यामुळे मुंबई-पुणे शिवनेरी अटल सेतूवर धावली तर या मार्गावरील प्रवासी बसमध्ये चढू शकणार नाही

२२ थांबे हुकणार

पुणे, कोकण, अलिबाग, कोल्हापूरसाठी जाणाऱ्या बस गाड्यासाठी दादर, कुर्ला नेहरूनगर, मैत्री पार्क, मानखुर्द ,वाशी, सानपाडा, नेरुळ जंक्शन, खारघर, कळंबोली आणि पनवेल या ७ प्रमुख थांब्यावर प्रवासी चढतात.येथे एसटीची तिकीट बुकिंग सेंटर आहे. याशिवाय सात प्रमुख बस थांब्यासह एकूण २२ सिटीबस थांबे आहे. जिथे लांबपल्याचा बस गाड्या थांबतात. मात्र, अटल सेतूवरून एसटी बसेस धावल्या तर २२ थांब्यावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

४५ प्रवासी मिळणे आवश्यक

दादर येथून शिवडी मार्गे अटलसेतू वरुन एसटी बस सुरु करायची असेल तर दादर स्थानकावर संपूर्ण बसचे ४५ प्रवासी मिळणे आवश्यक आहे.परंतू, २२ थांबे हुकवून बस फुल होणे शक्य होणार नाही. त्यातही अटल सेतुवरचे टोल शुक्ल जास्त आहे. मात्र तरीही प्रायोगिक तत्त्वावर दादर- शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल -पुणे अशा काही फेऱ्या चालवणे शक्य असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने 'सकाळ'ला दिली आहे.

या बसेस अटल सेतूवरुन धावू शकतात

१. स्वारगेट-मंत्रालय ,वेळ- सकाळी ६

२. मंत्रालय - स्वारगेट, वेळ- संध्याकाळी ६

३. पुणे स्टेशन - मंत्रालय, वेळ-सकाळी ६.४५

४. मंत्रालय- पुणे स्टेशन, वेळ- संध्याकाळी ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Accident : जळगावजवळ भीषण अपघात: दुभाजकावर धडकलेल्या कारने घेतला पेट; गर्भवती महिलेचा करुण अंत

Latest Marathi Breaking News : मालेगाव पोलिस सज्ज; दिल्ली बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट

Today Horoscope: भौम-पुष्य योगाचा संयोग! कर्क, कन्या आणि इतर राशींवर बजरंगबलींची विशेष कृपा; वाचा आजचं राशीभविष्य

Bullock Cart Race: 'बोरगावात श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत एक ठार'; बारा जण जखमी, कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा

Viral Video: पठ्ठ्याने रिलसाठी चक्क धावत्या ट्रेनच्या दरवाजात केली आंघोळ, पण नंतर बसला मोठा झटका; पाहा नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT