migrants at Thane
migrants at Thane 
मुंबई

पायपीट वाचली! श्रमिकांसाठी धावली एसटी

दीपक शेलार

ठाणे : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले परराज्यातील हजारो श्रमिक पायपीट करत मूळगावी निघाल्याने त्यांच्या मदतीसाठी एसटी बस धावून आली आहे. ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या सहकार्याने राज्य परिवहन महामंडळाने यासाठी पुढाकार घेतल्याने भर उन्हात ठाण्यातील 11 थांब्यांवर श्रमिक बॅगा ठेवून रांगा लावत आहेत. दरम्यान,10 मेपासून आजपावेतो (18 मे) एकूण 1043 बसद्वारे तब्बल 26 हजार 768 श्रमिकांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडण्यात आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

लॉक डाऊनमुळे उपासमार होऊ लागली, त्यातच तासनतास उन्हात उभे राहून देखील गावी जाण्यासाठी रेल्वेची पुरेशी व्यवस्था होत नसल्याने पोलिसांनाही परवानगी देण्यात अडचणी उद्भवत होत्या. लॉकडाऊन संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर हे श्रमिक मिळेल त्या वाहनाने तसेच, पायपीट करीत मूळगावी निघाल्याने महामार्गावर तांडेच्या तांडे दिसू लागले. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या मजुरांना किमान मध्यप्रदेश सीमेवर सोडण्यासाठी लालपरी सरसावली आहे. 

त्यानुसार, 10 मेपासून ठाण्यातील कोपरी-आनंदनगर चेकनाका, तीनहात नाका, नितीन कंपनी जंक्शन, कॅडबरी सिग्नल, कापूरबावडी-माजीवडा, कळवा-खारेगाव, भिवंडी-माणकोली, रांजणोली नाका, कल्याण महात्मा फुले चौक, खडकपाडा आणि कल्याण बाजारपेठ अशा 11 ठिकाणाहुन मोफत बसची व्यवस्था करण्यात आली. यासाठी दररोज श्रमिकांचे तांडेच्या तांडे या नियोजित थांब्यांवर आपल्या सामानाच्या बॅगा ठेवून रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. 

इतर आगारातून मागवल्या बस
  ठाणे आगाराच्या बस अपुऱ्या पडत असल्याने रायगड व नाशिक आगारातील बसची मदत घेण्यात येत असून मजुरांची थर्मल तपासणी करूनच यादीनिहाय बसमध्ये बसवले जात आहे. आतापर्यंत 1043 बसेसमधून 26 हजार 768 श्रमिकांना राज्याच्या सिमेवर सोडण्यात आले. सोमवार 18 मे या दिवशी 88 एसटीमधून 2204 मजुरांना सोडण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली होती, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT