मुंबई

'एसटी'चे चाक खोलातच! उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने महामंडळ महसूली तोट्यात

प्रशांत कांबळे


मुंबई ः गावापासून शहरापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा देणारी एसटी दिवसेंदिवस अधिकच खोलात रुतताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांचा खर्चाचा आलेख बघता उत्पन्नापेक्षाही खर्चच जास्त आहे. 2019-20 या वर्षातील 8745.43 कोटी वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत एकूण वार्षिक खर्च 9548.93 कोटी आहे. त्याप्रमाणे 2020-21 च्या एसटीच्या वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजात एकूण उत्पन्न 9665.14 कोटी, तर एकूण वार्षिक खर्च मात्र 10 हजार 467.17 कोटी दाखवण्यात आला आहे. 

दिवसेंदिवस प्रवासी संख्या कमी होत असल्याने एसटीवर आर्थिक संकट वाढत असताना या वर्षी मात्र कोरोनामुळे एसटी महामंडळाचे दिवाळे निघाले आहे. गेल्या सात महिन्यांपासून एसटीची सेवा बंद असल्याने दैनंदिन सुमारे 22 कोटी रुपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागला आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत एसटीजवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत. अशा परिस्थितीत सध्या राज्य सरकारने आगाऊ दिलेल्या 750 कोटींमधून कर्मचाऱ्यांच्या वेतनाची तात्पुरती कोंडी सोडवली आहे;

मात्र एसटीवर आर्थिक संकट दूर करण्यासाठी एसटीच्या मालमत्ता आणि इतर बॅंकेच्या कर्जाचा पर्याय एसटीला निवडावा लागण्याची शक्‍यता आहे. त्यातच गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, करार, थकबाकी यामध्ये केल्याचे दिसून येत आहे, तर इंधन, भांडार सामान, प्रवासी कर, घसारा आणि सर्वसाधारण प्रशासकीय खर्चामध्येही सर्वाधिक खर्च झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा अतिरिक्त खर्चाची मर्यादा पाळून एसटीला पुन्हा उभारी देण्याचे एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांना आव्हान पेलावे लागणार आहे. 

-----------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Rashid Khan: पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर रशीद खानचा तीव्र संताप; म्हणाला, 'रमजानच्या पवित्र महिन्यात ही क्रूरता...'

IPL Kisse: वानखेडेवर शाहरुखचा संताप! विलासराव देशमुखांचा एक निर्णय अन् 5 वर्षांची बंदी, 2012 मधील IPL सामन्यात काय घडलं होतं?

NDA Rajya Sabha Majority : राज्यसभेत एनडीएची दमदार एंट्री; बहुमताचा आकडा पार, विधेयक मंजुरीसाठी येणार नाही अडचण

Nagpur News: विद्युत पोलवरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू; देवलापारच्या वाघोली परिसरातील घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT