मुंबई

ST ची स्वेच्छा निवृत्ती योजना लागू, 50 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले कर्मचारी ठरणार पात्र 

प्रशांत कांबळे

मुंबई, ता.9 : वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली आहे. 30 जूनपर्यंत 50 वर्ष पूर्ण करणारे किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या अधिकारी, कर्मचारी या योजनेस स्वेच्छा पात्र राहणार आहे. एसटीच्या 27 हजार पात्र एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत असल्याने, एसटी महामंडळाचे महिन्याला 100 कोटींची बचत होणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे.

खासगी प्रवासी वाहतुकीच्या चकाचक पर्यायांमुळे एसटीच्या प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आधीच एसटीचे उत्पन्न बुडाले, त्यात कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल 7 महिने एसटीची सेवा बंदच असल्याने एसटीची तिजोरी रिकामी झाली आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला असून,राज्य शासनाच्या विशेष आर्थिक पॅकेजवर एसटीचा डोलारा सध्या सुरू आहे. एसटीची मालमत्ता, डेपो बँकेत तारण  ठेऊन कर्ज घेणे, त्याशिवाय एसटीच्या मालवाहतुकीला प्राधान्य देऊन कमाई करण्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा प्रयत्न आहे. 

मात्र, एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिरिक्त झालेल्या 30 कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एसटीवर बोझा पडत असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांसाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना आणली आहे. या योजनेमुळे  सुमारे 27 हजार कर्मचारी, अधिकारी सध्या पात्र ठरत असून, 1 जुलै ते 31 डिसेंबर पर्यंत 50 वर्ष वय होणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांबद्दल एसटीचे संचालक मंडळाच्या पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे महामंडळाने सांगितले आहे.

महिन्याचे 100 कोटी खर्च वाचणार : 
सध्या एसटी महामंडळात 18,000 एकूण बसेस आहे त्यापैकी सध्या फक्त 12,000 बसेस सुरू आहे. त्यामुळे सुमारे 30 टक्के अतिरिक्त कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून घर बसल्या वेतन द्यावे लागत आहे. त्यामुळे एसटीच्या एकूण 98 हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संख्यापैकी स्वेच्छा निवृत्तीस पात्र 27 हजार कर्मचाऱ्यांनी जरी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास महिण्याला 100 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. सध्या दरमहा 286 कोटी रुपये एकट्या वेतनावर खर्च केला जात आहे.
 
योजनेचा असा लाभ मिळणार

  • सेवानिवृत्तीप्रमाणे देय असलेले भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजा रोखीकरण इत्यादीचे लाभ मिळणार 
  • सेवानिवृत्तीनंतर स्वीकारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास 15 दिवसात त्याचा निपटारा केला जाईल
  • स्वेच्छासेवानिवृत्तीनंतर मोफत कौटुंबिक पास देण्याची योजना लागू राहील.

स्वेच्छानिवृत्ती धोरणात्मक बाब असतानाही मान्यताप्राप्त संघटनेबरोबर चर्चा न करताच योजनेची घोषणा केली आहे. निवृत्तीनंतर शिल्लक सेवेच्या प्रतिवर्षासाठी 6 महीन्यांचे वेतन व वारसास नोकरी संघटनेच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही योजना कामगारांसाठी अन्यायकारक आहे असं  संदीप शिंदे (अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना) म्हणालेत. 

स्वेच्छानिवृत्ती योजनेत केवळ 3 महिन्याचे वेतन देणार असल्याने कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीची संमती देणार नाहीत, ही योजना फसवी आहे त्यामुळे दर वर्षाला आठ महिन्याचा पगार द्यावा असं मुकेश तिगोटे (सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)) म्हणालेत. 

निवृत्तीनंतर 90 दिवसाऐवजी 180 दिवसाचा लाभ द्यावा. तर गंभीर गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे सक्त ताकीदवर निकाली काढावे, सोबतच निवृत्ती घेतांना कर्मचाऱ्यांना विचार करण्यास मुदतवाढ द्यावी. त्यासोबतच शिल्लक रजा, काराराची थकबाकी, भविष्य निर्वाह निधी व उपदान या सर्व देणी एकरकमी मिळाव्यात, असं हिरेन रेडकर (सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना) म्हणालेत.

कर्मचाऱ्यांची नवीन वेतनवाढ होणे गरजेचे आहे. बहुसंख्य कर्मचारी वेतन कमी मिळत असल्याने चिंतेत आहे.त्यामुळे निवृत्तीनंतर उरलेल्या प्रत्येक वर्षाला तीन महिन्यापेक्षा महिने वाढवल्यास एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचा फायदा होईल असं श्रीरंग बरगे (सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेस) म्हणालेत.

ST to roll out VRS services employees who are above 50 years are eligible

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT