court sakal
मुंबई

शरद पवार हल्ला प्रकरण : अटकेतील आठ आरोपींना पोलीस कोठडी

न्यायालयाने सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : राष्ट्रावादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईत घरावर हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, संपकरी कर्मचाऱ्यांना (ST Worker Strike) भडकवल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratn aSadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी अटकेली असून, न्यायालयाने सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी अटक केलेल्या आठही आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अभिषेक पाटील, मोहम्मद ताजुद्दीन, सविता पवार यांना गिरगाव न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Silver Oak Protest)

कृष्णा कोरो, सविता पवार, अभिषेक पाटील आणि मोहम्मद ताजुद्दीन हे सदावर्ते यांचे निकटवर्तीय होते. या सर्वांना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व आरोपींचे मोबाईल पोलिसांना यापूर्वीच जप्त केले आहेत. न्यायालयातील युक्तीवादादरम्यान, सरकारी वकीलांनी सांगितले की, 7 एप्रिलला वकीस सदावर्ते यांच्या घरी बैठक झाली. याच बैठकीत हल्ल्याचं षडयंत्र शिजल्याचे आरोपी सच्चिदानंदपुरी याने तपासा सांगितले आहे. याशिवाय सविता पवार आणि अभिषेक पाटील हे सिल्व्हर ओक येथील सीसीटिव्ही कॅमेरात आंदोलनादरम्यान स्पष्टपणे दिसून येत आहेत. या दोघांनी आंदोलकांना शरद पवारांचे घर कुठले आहे आणि त्यांना या ठिकाणी पोहचण्यासाठी मदत केल्याचेही फुटेजवरून दिसून येत आहे.

आरोपींकडून पासवर्ड सांगण्यास टाळाटाळ

या सर्व घटनेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र, जप्त केलेले मोबाईल लॉक असून त्याचा पासवर्ड ही मंडळी पोलिसांना देत नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्यामुळे या सर्वांकडून अधिकची माहिती घेण्यासाठी विलंब होत असल्याचे वकीलांनी सांगितले. त्यामुळे या सर्वाची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याने या सर्वांच्या पोलीस कोठडीची मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली. त्यांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने आरोपींना उद्यापर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या या चौघांसह सदावर्तेंनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत कोठडी

‘सिल्वर ओक’ निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने केली. ॲड. सदावर्ते यांच्या खात्यात दीड कोटीहून अधिक रक्कम कोणाकडून आली आणि ती कशी वापरली गेली याचा तपास करायचा आहे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. १३ एप्रिलपर्यंत सदावर्ते यांना पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे.

मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. त्यांनी ॲड. सदावर्ते यांना १४ दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. गिरगाव न्यायालयात आज पोलिसांकडून अनेक खुलासे करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला पूर्वनियोजित होता, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार आणि सदावर्ते यांच्यातील घटनेच्या दिवसाचे सकाळी साडेदहा वाजल्यापासूनचे चॅट उघड झाले आहे. त्यांच्यामध्ये व्हिडीओ कॉलही झाला होता. पवार यांच्या घराची रेकी अभिषेक पाटील, सविता पवार, कृष्ण कोरे आणि मोहंमद ताजुद्दीन यांनी केली होती. बारामतीमध्ये कामगारांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती, असे खुलासेही घरत यांनी केले.

हल्ल्याचा कट पूर्वनियोजित!
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या खात्यात तब्बल एक कोटी ८० लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ती त्यांनी एसटी कामगारांकडून प्रत्येकी ५५० रुपये घेऊन जमा केली, असा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय हल्ला करण्याआधी इशारा देणारे बॅनरही लावण्यात आले होते. त्यामुळे संबंधित घटना पूर्णपणे सुनियोजित कट होता, असे वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

नागपूरहून दूरध्वनी?
अन्य एका व्यक्तीने नागपूरहून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दूरध्वनी केला होता, असे सांगण्यात आले. मात्र, त्याचे नाव आज सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उघड केले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश गल्लीतील मुंबईचा राजा लालबागमध्ये पोहोचतोय

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT