मुंबई

एसटीची हंगामी दरवाढ मागे 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळाच्या भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामातील महसूलवाढीच्या उद्देशाने यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे. 6 नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा दिवाळीच्या सुट्टीत 25 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) बस सेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट 10 टक्के दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीमुळे दररोज सुमारे 2 कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे.

या काळात एसटीच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल एसटी महामंडळाने प्रवाशांचे हार्दिक आभार मानले आहेत.  

web title :ST take back its seasonal hike  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT