bridge
bridge 
मुंबई

मुंबईत तयार होणार भारतातला पहिलावहिला अनोखा पूल..भाईंदर स्थानकाला मिळणार नवी बळकटी.. 

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांचं प्रमाण वाढत आहे. मात्र आता राज्य सरकारनं विकासाच्या कामांना सुरुवात करण्याचं निश्चित केलं आहे. म्हणूनच आता भाईंदर रेल्वे स्थानकात देशातील पहिला स्टेनलेस स्टील फूटओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून चर्चेगेट दिशेकडे उभारल्या जाणाऱ्या पूलास काही दिवसात सुरुवात होणार आहे.

लाखो मुंबईकरांसाठी मोलाचे असलेल्या रेल्वे स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजचे आयुष्य वाढवण्यासाठी ते स्टेनलेस स्टीलचे करण्याचे ठरले. त्यासाठीच्या पायलट प्रोजेक्टसाठी भाईंदरची निवड झाली होती. भाईंदर स्थानकात सध्या तीन रेल्वे पूल आहेत. आता चर्चगेट दिशेकडील जुन्या पूलाऐवजी हा नवा स्टेनलेस स्टीलचा पूल असेल. तो 76 मीटर लांब तसेच 10 मीटर रुंद असेल. काम सुरु झाल्यावर जुना पूल बंद करण्यात येईल. नव्या पुलाचे काम या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

स्टेनलेस स्टीलच्या पूलाचा खर्च पारंपारीक पूलांपेक्षा 25 टक्के जास्त असेल, पण त्याच्या निगराणीचा खर्च कमी असेल. त्यामुळे या पूलांचे बांधकाम भविष्यात करण्याचा विचार आहे. यामुळे भाईंदरचा हा नवा पूल रेल्वेसाठी महत्त्वाचा आहे.

देशभरातील रेल्वेस्थानकात 1 लाख 35 हजार पादचारी आहेत. त्यातील 25 टक्के पूल हे शंभर वर्षाहून जूने आहेत. ते तातडीने बदलण्याची गरज आहे. दरवर्षी एक हजार पूलांचे नूतनीकरण करण्यात येते, त्यानंतरही बॅकलॉग सातत्याने वाडत आहे. 

भारतास साडेसात हजार किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. या किनाऱ्याशेजारी असलेल्या स्थानकातील पादचारी पूलांचे जास्त नुकसान होते. याच टप्प्यात मुंबई तसेच उपनगरातील स्थानके येतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता असते.

stainless steel bridge will build on bhayandar railway station read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी T20 जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT