मुंबई

परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम, मंत्री उदय सामंत म्हणालेत...

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्रात शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा होणार की नाही यावर विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकार शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राचा परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सध्याच्या कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नाही. अशात केंद्र सरकारने देखील राज्य सरकारच्या भूमिकेला समर्थन द्यावं असं उदय सामंत म्हणालेत. 

काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना UGC चे उपाध्यक्ष पटवर्धन यांनी वाईन शॉप्सना परवानगी मिळते मग परीक्षा का नकोत असा युक्तिवाद केला होता. यावरही उदय सामंत यांनी आपलं मत मांडलं. वाईन शॉप्स आणि विद्यापीठांची तुलना चुकीची असल्याचं सामंत म्हणालेत. वाईन शॉपमध्ये जाणं बंधनकारक नाही, मात्र तुम्ही इथे बंधनकारक करताय असंही उदय सामंत म्हणालेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून UGC विरुद्ध राज्य सरकार हा वाद सुरू आहे. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचं उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. सोबतच ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना संधी देणार असल्याचंही सामंत म्हणालेत. याबद्दल बोलताना सामंत यांनी पालक आणि प्राध्यापकांची परीक्षेबाबतची भूमिका देखील मांडली. राज्यातील पालक आणि प्राध्यापक देखील सध्या परीक्षा घेतल्या जाव्यात या मताचे नाहीत. कोरोना गेल्यानंतर परीक्षा घेण्यास आम्ही तयार असल्याचं उदय सामंत म्हणालेत. 

state government once again clears their stands says not possible to conduct exams amid corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT