mumbai sakal
मुंबई

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे प्रतिपादन

थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी कमी करणे हीच त्रिसुत्री

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ग्राहकांकडे वीज बिलांपोटी (Light Bill) असलेली थकबाकी, वीजखरेदी खर्च आणि वीजहानी (Light) याचे प्रमाण कमी करणे हीच आपली त्रिसुत्री आहे. यासाठी आपण सर्वांनी काम करायचे असून आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे, प्रतिपादन महावितरणचे (MSEB) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल ( Vijay Singhal ) यांनी बुधवारी व्यक्त केले.

महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महावितरणचे संचालन संचालक संजय ताकसांडे, प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत, वित्त संचालक रवींद्र सावंत आणि वाणिज्य संचालक सतिश चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. विजय सिंघल पुढे म्हणाले की, भारतरत्न मोक्षगुंडम विश्वैश्वरैया यांचे विचार परिघापलीकडील होते. अभियंता देश घडवित असतो. राष्ट्रनिर्मिती करतो. त्याचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात. त्यांच्यात वेगळी क्षमता असते. जगात जे कुणी करु शकत नाही, ते अभियंता करु शकतो.

अभियंता म्हणून आपल्यात असलेल्या पूर्ण क्षमतेने आपण काम करायला हवे, केवळ दैनंदिन काम नव्हेतर त्याचसोबत काही वेगळे काम करणे म्हणजे अभियंता होय. याशिवाय आपल्याला कामाचे समाधान मिळविता येणार नाही. महावितरण ही माझी स्वत:ची कंपनी आहे, म्हणून सतत कार्यरत रहाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आज महावितरण पुढे अनेक समस्या आहेत. मात्र अजुनही वेळ गेलेली नाही. आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. मागिल वर्षीच्या तुलनेत यावर्षी वसुलीमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. यात अनेक अडचणी आल्यात आणि काम करणा-या माणसाला अडचणी येणारच हा विचार करुन आपले नेहमीचे कार्य करत रहा. आपल्या सेवांचा दर्जा वाढवायला हवा, ग्राहक राजा आहे, असे समजून स्वत:साठी व कंपनीसाठी आपल्याला काम करायचे आहे, असे आवाहन सिंघल यांनी केले. या कार्यक्रमाला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT