मुंबई

मुंबईतील रस्त्यावर वाहनांची गर्दीच गर्दी; पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतुक कोंडी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : मुंबईत सोमवारपासून कार्यालय सुरू झाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पहायला मिळाली. मुंबई महानगर परिसरात  जीवन सर्वसामान्य होत असल्यामुळे मोठ्याप्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरली. उपनगरावरून शहरात येणा-या तसेच जाणा-या मार्गिकांवर विशेष गर्दी पहायला मिळाली.विशेष करून पश्चिम द्रुतगरीत मार्गावर कांदिवली येथे सकाळी वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. त्या दिवसापासून मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांची वरदळ पूर्णतहा थांबली होती. गल्लोगल्ली पोलिसांनी नाकाबंदी लावत लॉकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु केली. आतापर्यंत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यावर 1 लाखाहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारपासून कार्यालय सुरू झाल्यानंतर त्यामुळे मुंबईच्या टोल नाक्यांवर आता वाहनांची पून्हा गर्दी दिसू लागली आहे. बस सुविधा सुरू करण्यात आल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने नागरीक आपल्या खासगी गाड्यांनीच प्रवास करत असताना दिसून आले.

मुंबईत दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पहायला मिळाली. तर सायन-पनवेल महामार्ग,किंग सर्कल, कलानगर, पश्चिम उपनगरात  अंधेरी, वांद्रे जंक्शनजवळ वाहने धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. तसेच वाशी, मुलुंड, दहिसर टोल नाक्यांवर दिसून येत आहे. या ठिकाणी वाहनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. विशेष करून ठाणे, मिरा रोड, नवी मुंबई व वसई येथून येणा-या वाहनांची संख्या अधिक होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर  अनेक नागरीक त्यांच्या खासगी वाहने घेऊन घरातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे कांदिवली येथेही वाहतुक कोंडी दिसली. तरी पूर्वीपेक्षा अर्धी वाहनेही मुंबईच्या रस्त्यावर अद्याप उतरली नसल्याचे एका अधिका-याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT